देशातील नागरिकांसाठी भारत सरकार हे अनेक योजना राबवत आहे. तसेच देशातील अनेक लोकांना सरकारी योजनेचा लाभ देखील मिळत आहे. यामध्ये बहुतेक करून गरजू गरीब लोकांचा समावेश आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून भारत सरकार गरजू गरीब लोकांना अत्यंत कमी दरात रेशन धान्य पुरवते.
या सरकारी कमी किमतीच्या रेशन धान्य योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या लोकांकडे शिधापत्रिका असणे गरजेचे आहे. असेच लोक यासाठी पात्र ठरतात. परंतु सरकारने शिधापत्रिका धारकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत. त्यानुसार 1 नोव्हेंबर पासून रेशन बंद होणार आहे. चला तर मग सदर लेखातून याबद्दलचे सविस्तर कारण जाणून घेऊया.
ई-केवायसी आवश्यक-
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून सर्व शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी करणे गरजेचे आहे. अशी माहिती अन्न व सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वी देखील जारी केली होती. परंतु अनेक शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. अशा रेशन कार्डधारकांचे रेशन हे 1 नोव्हेंबर पासून बंद होणार आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार ई-केवायसाठी 31 ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.
म्हणजेच याचा अर्थ असा की जर 31 ऑक्टोबर पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया शिधापत्रिकाधारकांनी पूर्ण केली नाही तर त्यांना पुढील महिन्यापासून रेशन मिळणे बंद होणार आहे. त्याचबरोबर अशा शिधापत्रिकाधारकांचे नावही शिधापत्रिकेतून काढून टाकण्यात येणार आहे. ज्या शिधापत्रिकांची ई-केवायसी केलेली नाही अशी शिधापत्रिका रद्द केल्या जातील. तसेच अशा शिधापत्रिका धारकांना सरकारच्या रेशन योजनेचा लाभ घेता येणार नाही.
ई-केवायसी का केली जाते-
जर एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू होऊन देखील अजूनही त्या व्यक्तीचे नाव शिधापत्रिकेमधून काढण्यात आलेली नाही. यासाठी ई-केवायसी केली जाते. म्हणून आता सर्व शिधापत्रिकाधारक म्हणजेच कुटुंबाच्या शिधापत्रकेमध्ये ज्यांची नावे नोंदवलेली आहेत त्या सर्वांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
त्यासाठी ते लोक त्यांच्या जवळच्या अन्नपुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊ शकतात. जर कोणत्याही सदस्यांनी ई-केवायसी न केल्यास त्याचे नाव शिधापत्रिकेतून काढून टाकण्यात येणार आहे. म्हणजे कुटुंबाच्या शिधापत्रिकेत ज्यांची नावे नोंदवलेली आहेत त्या सर्वांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.