‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेच्या अर्जासाठी नवीन पोर्टल सुरू.

महाराष्ट्रामध्ये सन 2015 पासून सौर ऊर्जेचे महत्त्व लक्षात घेऊन राज्य शासनाकडून सौर कृषी पंपाच्या विविध योजना राबवल्या जातात. या अगोदर अटल सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबवण्यात आली होती. तसेच प्रधानमंत्री कुसुम घटक-ब योजनेच्या माध्यमातून सौर कृषी पंप बसवले जात आहेत.

राज्यामध्ये दि,. 9 सप्टेंबर 2024 पर्यंत 2 लाख 63 हजार 153 सौर कृषी पंप बसवण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांकडून या सौर कृषी पंपासाठी मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य शासनाने मागील त्याला सौर कृषी पंप योजना जाहीर केलेली आहे.

सदर योजनेच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य-

राज्य शासनाच्या सन 2024 च्या अर्थसंकल्पात मागील त्याला कृषी पंप योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील जवळपास 8 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाच्या माध्यमातून ठेवण्यात आलेले आहे. या अगोदर ही योजना पीएम कुसुम या योजनेच्या माध्यमातून राबवली जात होती.

ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलश्रोत आहे तसेच ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या सिंचना करता पारंपारिक पद्धतीने वीजपुरवठा नाही, अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबवण्यात येते. तसेच महावितरणाकडे पैसे भरून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देखील देण्यात येणार आहे.

सदर योजनेचे उद्दिष्टे-

  • जे शेतकरी सर्वसाधारण गटातील आहे त्यांना फक्त 10 टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स व कृषी पंपांचा पूर्ण संच मिळणार आहे.
  • अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांना फक्त 5 टक्के लाभार्थी हिस्सा भरायचा आहे.
  • उर्वरित रक्कम ही केंद्र सरकार व राज्य सरकारकडून अनुदान म्हणून देण्यात येणार आहे.
  • जमिनीच्या क्षेत्रानुसार 3 ते 7.5 एचपीचे पंप देण्यात येणार आहेत.
  • यामध्ये पाच वर्षाची दुरुस्ती हमी, इन्शुरन्स सह लाभ देण्यात येणार आहे.
  • यामुळे विज बिल व लोड शेडिंगची चिंता नाही.
  • या योजनेच्या माध्यमातून सिंचनासाठी दिवसा विज पुरवठा मिळणार आहे.

सदर योजनेचे लाभार्थी निवडीचे निकष-

  • ज्या शेतकऱ्याकडे 2.5 एकरापर्यंत शेतजमीन आहे अशा शेतजमीन धारकाला 3 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचे सौर कृषी पंप देण्यात येणार आहे. 2.5 ते 5 एकरापर्यंत शेतजमीन आहे अशा शेतजमीन धारकाला 5 अश्वक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप देण्यात येणार आहे.
  • 5 एकरावरील शेतजमीन धारक असलेल्या शेतकऱ्यास 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप देण्यात येणार आहे.
  • जर पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषी पंपाची मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील.
  • जे शेतजमीनधारक वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहीर, बोअरवेल यांचे मालक तसेच बारामाही वाहणारी नदी/नाले यांच्या शेजारील शेतजमीन धारक या योजनेसाठी पात्र राहणार आहेत.
  • ज्या शेतकऱ्याकडे बोरवेल, विहिर व नदी इत्यादी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येणार आहे. तसेच जलसंधारण कामाच्या पाणी जिरवण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत.
  • अटल सौर कृषी पंप योजना-1, अटल सौर कृषी पंप योजना-2 व मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या योजनेसाठी पात्र असणार आहेत.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • सातबारा उतारा
  • आधार कार्ड
  • जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती/जमाती लाभार्थी असतील त्यांच्यासाठी)
  • अर्जदार स्वतः शेतजमीचा एकटा मालक नसेल तर इतर हिस्सेदारांचा /मालकांचा ना हरकत दाखला देणे बंधनकारक आहे
  • पाण्याचा स्रोत डार्क झोनमध्ये असल्यास भूजल सर्वेक्षण विभागामार्फत ना हरकत प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे.
  • संपर्कासाठी मोबाईल क्रमांक, ई-मेल पत्ता
  • पाण्याची खोली व त्याची माहिती अर्जामध्ये भरणे गरजेचे आहे.

सदर योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी-

या योजनेच्या माध्यमातून नवीन सौर कृषी पंप मिळवण्याकरता महावितरण तर्फे स्वतंत्र वेब पोर्टल निर्माण करण्यात आलेले आहे. खाली दिलेल्या वेब पोर्टल लिंकवरती जाऊन अर्जदारास A-1 अर्ज ऑनलाईन भरायचा आहे. हा अर्ज साधा व सोपा असून अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

अधिकृत वेब पोर्टल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *