ई-पीक पाहणी नोंदणीमध्ये सर्व्हर डाऊनची समस्या येत असल्यामुळे, तसेच अंतिम मुदतीमुळे शेतकऱ्यांची धावपळ

शेतकरी हे ई-पीक पाहणीची अंतिममुदत जवळ आल्यामुळे आपल्या शेताच्या बांधावर जात आहेत. परंतु ई-पीक पाहणीमध्ये सर्व्हर डाऊनची समस्या उद्भवत असल्याने शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आलेले असताना सर्व शेतकरी हे सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे त्रस्त झालेले आहेत.

23 सप्टेंबरपर्यंत ई-पीक पाहणी नोंदणीची अंतिम मुदत असून सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे ती या काळात पूर्ण होणे अवघड आहे, त्यामुळे सरकारने ही मुदत वाढवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. जर पीक क्षेत्रातील योग्य आकडेवारी उपलब्ध झाली तर त्यानुसार शासनाला धोरण ठरवता येते. यासाठी शासनाने हे ई-पीक पाहणीचे ॲप उपलब्ध करून दिलेले आहे.

परंतु जिल्ह्यात याबाबत शेतकऱ्यांमध्ये पुरेशी जागृती झालेली नाही. शेतकऱ्यांना स्वतःच्या मोबाईल मधून ई-पीक पाहणी करता येते, परंतु नोंदणी करताना वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ई-पीक पाहणीची नोंदणी पूर्ण होत नाही. पीक विमा तसेच इतरही अनेक बाबींसाठी सातबारा उताऱ्यावर अद्यावत पीक पेऱ्यांची नोंद असणे गरजेचे आहे.

23 सप्टेंबर पर्यंत पीक नोंदणीची अंतिम मुदत असून सर्व्हर डाऊनमुळे अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने पीक पाहणीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देणे गरजेचे आहे. या वर्षाची ई-पीक पाहणी नोंदणीसाठी अडचण येत आहेत. दिवसभर अ‍ॅप चालत नसल्यामुळे सकाळ-संध्याकाळच्या वेळी पीक नोंदणी करावी लागत आहे. शेतकऱ्यांना याबाबत प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

तसेच अ‍ॅप व्यवस्थित चालत नसल्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांची ई-पीक नोंदणी विहित मुदतीत पूर्ण होणार नसल्याचे मत शेतकऱ्यांद्वारे व्यक्त केले जात आहे. मागच्या वर्षी ई-पीक पाहणी नोंदणी करताना सर्व्हर डाऊनची समस्या फारशी उद्भवत नव्हती. महसूल विभागाकडून तलाठी शेतात येऊन अडचणी सोडवत आहेत. ई-पीक पाहणी नोंद करताना सर्व्हर डाऊनमुळे येत असलेल्या अडचणी बाबत वरिष्ठांना कळविले असल्याची माहिती करवीर तालुक्यातील राशिवडे गावाचे मंडल अधिकारी श्री.कोरे यांनी सांगितले आहे.

ई-पीक पाहणी नोंदणीचे फायदे-

  • शेतकऱ्यांच्या पीक पेरणीचे अचूक नोंद होणार
  • नोंदीमुळे राज्यात एखाद्या पिकाचा पेरा किती झाला आहे याचे अचूक आकडेवारी मिळणार
  • पिकाच्या छायाचित्रामुळे किती अक्षांश व रेखांशावर कोणत्या पिकाचा पेरा झाला आहे याची माहिती मिळणार

ई-पीक पाहणी नोंदणीतील अडथळे-

  • सर्व्हर डाऊनमुळे छायाचित्र अपलोड करता येत नाही.
  • सर्व्हर हळू काम करत असल्यामुळे जास्त वेळ लागत आहे.
  • ॲपमध्ये नाव नोंदणीनंतर काही टप्पे पूर्ण होतात. परंतु सर्व्हर डाऊनमुळे  प्रक्रिया पूर्ण होत नाही.
  • शेतकऱ्यांमध्ये जनजागृती आणि मार्गदर्शनाचा अभाव
  • सर्व शेतकऱ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *