केंद्र सरकारने कांद्यावरील किमान निर्यात किमतीचे निर्बंध हटवण्यासाठी निर्णय घेतलेला आहे. जर कांद्याच्या प्रति टनास 550 प्रति डॉलर इतका भाव मिळणार असेल तरच कांदा निर्यातीची परवानगी मिळत असे. परंतु केंद्र सरकारने आता कांद्यावरील किमान निर्यात मूल्याची अट ही रद्द केलेली आहे. तसेच कांद्यावरील 40% असणारे निर्यात शुल्क गठून 20% इतके केले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे कांदा व्यापाऱ्यांनी स्वागत केले आहे.
परंतु केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय सिस्टीम अपडेट न झाल्याने बांगलादेश बॉर्डरवर 100 कंटेनर तर मुंबई पोर्टवर 300 कंटेनर अडकून पडले होते. कांद्याच्या निर्यातीसंदर्भातील हे निर्णय सिस्टीममध्ये अपडेट झाले नव्हते. त्यामुळे कांद्याची निर्यात बंद होती. हे निर्णय अपडेट झाल्यानंतर काल दुपारपासून कांदा निर्यात सुरू करण्यात आलेली आहे. घोजाडांगा बॉर्डरवरून 29 ट्रक कांद्याची तर हिली बॉर्डरवरून 10 ट्रक कांद्याची निर्यात काल बांगलादेशला करण्यात आली आहे. भारतामधून घोजाडांगा व हिली या दोन्ही ठिकाणाहून एकूण 39 कांदा कंटेनरची निर्यात झाली आहे.
निर्यातीच्या कांद्यास किती दर मिळाला?-
नाशिक जिल्ह्यातील कांद्याला बॉर्डरवर 61 ते 64 रुपये प्रतिकिलो दर मिळाला. तर दक्षिणेकडील कांद्याला 62 ते 64 रुपये प्रतिकिलो दराने बॉर्डरवरून विक्री करण्यात आली. मध्य प्रदेशातील कांद्याला 58 ते 61 रुपये प्रतिकिलो इतका दर बॉर्डरवर मिळाला.
परदेशात कांद्याची मागणी वाढली-
कांदा निर्यात शुल्कात 40 टक्केवारी 20 टक्के इतकी कपात केल्याने कांदा निर्यात वाढू लागली आहे. भारतीय कांद्याची मागणी ही बांगलादेश, श्रीलंका, आखाती देश व मलेशिया या देशांमध्ये होत आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.