कृषी विभागाच्या मार्फत बॅटरी संचलित फवारणी पंप या योजनेसाठी महाडीबीटी मार्फत ऑनलाईन लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे. महाडीबीटी या पोर्टलच्या मार्फत राज्यातील कृषी विभागाच्या शेतकऱ्यांकरिता योजना राबवल्या जातात. त्यातीलच बॅटरी संचालित फवारणी पंपासाठी लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे. फवारणी पंपासाठी 100 टक्के अनुदान राज्य पुरस्कृत कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2024-25 अंतर्गत बॅटरी संचलित फवारणी पंपासाठी शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान देण्यात येणार होते.
राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केले होते. आता या योजनेची सोडत जाहीर करण्यात आलेली आहे. ही योजना लॉटरी पद्धतीने राबविण्यात येणार होती. लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या शेतकऱ्यांना महाडीबीटीमार्फत हे संदेश पाठवलेले आहेत. या लाभार्थ्यांना बॅटरी संचलित फवारणी पंपाचे वितरण केले जाणार आहे. त्यासाठी कृषी सहाय्यकांशी संपर्क करण्याचे संदेशात म्हटले आहे.
आवश्यक कागदपत्रे-
- आधार कार्ड
- 7/12 उतारा
- पिकांची माहिती
- आवश्यक असल्यास जातीचा दाखला
- बँक पासबुक झेरॉक्स आधारकार्डशी संलग्न
- मोबाईल क्रमांक
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच जर वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.