शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून वर्षाला तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 17 हप्ते दिलेले आहेत. आता पीएम किसान योजनेचा माध्यमातून 18 वा हप्ता कधी मिळणार आहे याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून राहिलेली आहे.
अनेक शेतकरी हे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र असताना देखील त्यांना याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे 18 वा हप्त्याचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना खालील महत्त्वाची कामे ही करावी लागणार आहेत.
सदर योजनेच्या माध्यमातून पुढील हप्ता मिळवण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी खालील तीन गोष्टी करणे गरजेच्या आहेत-
- जमिनीची कागदपत्रे अपलोड करावी.
- सक्रिय बँक खात्याशी तुमचा आधार लिंक आहे की नाही ते पाहावे.
- तसेच ई-केवायसी म्हणजेच PM KISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी eKYC गरजेची आहे. OTP आधारित eKYC PM KISAN पोर्टल उपलब्ध आहे किंवा बायोमेट्रिक आधारित eKYC साठी जवळच्या CSC केंद्राशी देखील संपर्क साधू शकता. या दोन पद्धतीने आपण eKYC पूर्ण करू शकता.
नोट– अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.
WhatsApp Group
Join Now