केंद्र सरकारच्या मोफत सूर्यघर योजनेत आता महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून अर्जदाराला अनुदानसाठी जास्त वेळ वाट पाहण्याची गरज लागणार नाही. फक्त 7 दिवसांमध्ये अर्जदारांना अनुदान मिळण्याची शक्यता आहे. याअगोदर या प्रक्रियेला एक महिना किंवा त्याहून अधिक कालावधी लागायचा. या योजनेच्या माध्यमातून तीन किलोवॅट वरच्या क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला 78 हजार रुपये देण्यात येणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रणाली बसून नागरिकांना मोफत व स्वच्छ ऊर्जा उपलब्ध करून देणे या उद्देशाने सुरू करण्यात आलेले आहे. या योजनेमुळे नागरिकांची विज बिलापासून सुटका तसेच पैशांची बचत होण्यास मदत मिळते. या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत देशभरातील 1.30 कोटीहून अधिक नागरिकांनी या योजनेत नोंदणी केलेली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे अनेक नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. महाराष्ट्र राज्यात आत्तापर्यंत साडेतीन लाख पेक्षा जास्त ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे.
सदर योजनेची अर्ज प्रक्रिया-
- सदर योजनेच्या अर्जासाठी केंद्र सरकारने एक स्वतंत्र पोर्टल तयार केलेले आहे. या योजनेचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक नागरिकांनी खालील दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन योजनेसाठी अर्ज करावा.
- अर्ज मंजूर झाल्यानंतर सौर ऊर्जा प्रणाली बसवण्याची प्रक्रिया सुरू होते.
- प्रणाली बसवून पूर्ण झाल्यानंतर सरकार थेट बँक खात्यात अनुदान जमा करते.
सदर योजनेच्या माध्यमातून किती अनुदान मिळते-
सौर ऊर्जा प्रणालीच्या क्षमतेनुसार सरकारच्या माध्यमातून अनुदान देण्यात येते. उदाहरणार्थ, 2 किलोवॅट क्षमतेच्या प्रणालीसाठी 30 हजार रुपये प्रति किलोवॅट, 3 किलोवॅटसाठी 48 हजार रुपये व त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी 78 हजार रुपये किलोवॅट असे अनुदान देण्यात येते.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच जर वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

