आज आपण सदर लेखातून कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थी यादी ऑनलाईन कशी पाहिजे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे नुकसान सोसावे लागले.
म्हणून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना 2 हेक्टरचा मर्यादित प्रति हेक्टरी 5 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली होती.
ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट DBT च्या माध्यमातूनच अर्थसहाय्य जमा करण्यात येत आहे.
कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थी यादी ऑनलाईन कशी पहावी–
- कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेसाठी पोर्टलवर विकसित करण्यात आलेले आहे. या पोर्टलवरती खातेदारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे.
- कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थी यादी ऑनलाईन पाहण्यासाठी खालील दिलेल्या सोयाबीन व कापूस अनुदान वेबसाईटवरती क्लिक करावे व ती ओपन करावी.
- त्यानंतर Farmer Search वरती क्लिक करावे.
- आता Farmer Login मध्ये आधार नंबर टाकून Get OTP for Aadhaar Verification वर क्लिक करावे.
- आता OTP टाकून फेरिफाय करायचे आहे. पुढे राज्यातील सर्व विभागातील कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी आपला विभाग, जिल्हा, तालुका व गाव निवडून सर्चवर क्लिक करावे.
- आता तुमच्यासमोर कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थी यादीमध्ये शेतकऱ्याचे नाव, सर्वे नंबर, खाते नंबर, पिकाचे नाव व क्षेत्र पाहायला मिळेल.
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग यांच्यामार्फत घेण्यात आलेले शासन निर्णय-
2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु.1000 तर 0.2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5 हजार रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यासाठी सरकारने प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या दि.11 जुलै 2024 च्या बैठकीत मान्यता दिलेली होती. त्यानुसार शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत.
- सन 2023 च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतीतील शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- सन 2023 च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना अर्थसहाय देण्याबाबतची कार्यपद्धतीबाबतीतील शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- सन 2023 च्या खरीप हंगामा मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाह्य देण्याकरता पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झालेल्या रु. 4194.68 कोटी निधीपैकी रु.2516.80 कोटी निधी सन 2024-25 मध्ये वितरित करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.