मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेबाबतची मोठी बातमी समोर आलेली आहे. या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण येत्या 29 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. याबद्दलची अधिकृत माहिती महिला व बालविकास कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना या निर्णयानंतर आता प्रतिमहा 1500 रुपये या हिशोबाने पैसे मिळणार आहेत.
आदिती तटकरे यांनी काय माहिती दिलेली आहे-
महिला व बालविकास कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी सरकारच्या या निर्णयाबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे होणार आहे. हा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम आहे.
या कार्यक्रमामध्ये सप्टेंबरपर्यंत आलेल्या अर्जाचा लाभ वितरीत करण्यात येणार आहे. अर्जात त्रुटी राहिल्यामुळे अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेता आलेला नाही. त्यामुळे या तिसऱ्या हप्त्यांमध्ये अशा महिलांना लाभ दिला जाणार आहे. या तिसऱ्या हप्त्यात एकूण 2 कोटी महिलांना लाभ दिला जाईल अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे.
आत्तापर्यंत दोन हप्ते आले-
ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत तसेच कागदपत्रांमध्ये कोणतीही त्रुटी नसलेल्या महिलांना आतापर्यंत जुलै व ऑगस्ट महिन्याचे दोन हप्ते आलेले आहेत. या दोन हप्त्याचे काही महिलांच्या बँक खात्यात 3 हजार रुपये जमा झालेले आहेत. या योजनेसंदर्भातील पहिला कार्यक्रम हा सरकारद्वारे पुणे शहरात आयोजित करण्यात आलेला होता. त्या कार्यक्रमात रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर या योजनेचा अधिकृतपणे शुभारंभ करण्यात आला होता.
त्यामुळे ऑगस्ट महिन्यात काही महिलांच्या खात्यात 2 महिन्याचे 3 हजार रुपये आले होते. तर या योजनेचा दुसरा कार्यक्रम हा नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देखील लाडकी बहिणी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे वाटप चालू करण्यात आले होते. आता तिसरा कार्यक्रम हा रायगड येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे वाटण करण्यात येणार आहे.
30 सप्टेंबरपर्यंत करता येणारा अर्ज-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज प्रक्रिया अजूनही चालू आहे. या योजनेच्या लाभासाठी येत्या 30 सप्टेंबरपर्यंत महिलांना अर्ज करता येणार आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.