मंत्रिमंडळ बैठकी सोमवारी (ता. 23) रोजी राज्यातील सहकारी व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या 5 रुपये दूध अनुदान ऐवजी 7 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु 35 रुपये हा दर कायम ठेवण्यात आलेला असून दूध संस्थांना 28 रुपये दर देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 1 ऑक्टोबर पासून हा वाढीव दर देण्याचे बंधनकारक करण्यात आलेले आहे.
राज्यात गायीच्या दुधाचे दर पडल्यामुळे राज्यातील दूध उत्पादकांना पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या अगोदर हा दर 30 रुपये दूध संस्था तर 5 रुपये सरकारी अनुदान असा 35 रुपये दर देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु नव्या निर्णयानुसार दूध उत्पादकांना दूध संघानी 3.5 फॅट/8.5 एसएनएफ या प्रति करता 1 ऑक्टोबर पासून 28 रुपये प्रति लिटर इतका दर देणे बंधनकारक आहे.
त्यानंतर दूध उत्पादकांना शासनाद्वारे सात रुपये प्रतिलिटर त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील. यामुळे या शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर 35 रुपये भाव यापुढेही मिळत राहणार आहे. ही योजना 1 ऑक्टोबर 2024 पासून राबवली जाईल. परंतु तिचा आढावा घेऊन मुदतवाढ देण्यात येईल. या योजनेसाठी 965 कोटी 24 लाख इतक्या खर्चास मान्यता दिली गेलेली आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.