पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता या दिवशी मिळणार.

आपले सरकार हे शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी विविध योजना आखत असते. यामधीलच एक म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. या योजनेच्या माध्यमातून सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांची आर्थिक मदत देते. आतापर्यंत या योजनेचे 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत.

परंतु आता शेतकऱ्यांना 18वा हप्ता कधी मिळणार याची चर्चा सुरू होती. मात्र लवकरच 18वा हप्ता देखील मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया या योजनेचा 18वा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे.

पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता कधी जमा होणार-

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धीला हातभार लावण्यासाठी मदत करते. आता या योजनेच्या 18व्या हप्त्याची वाट शेतकरी पाहत आहेत. या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देते.

त्यामुळे या माध्यमातून शेतकरी त्यांच्या शेतीचा गरजा पूर्ण करू शकतील व आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकतील या उद्देशाने ही योजना चालू करण्यात आली आहे. आत्तापर्यंत सरकारने 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5 ऑक्टोबर 2024 रोजी जमा करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनी या सूचनांचे पालन करावे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने ई-केवायसी व जमीन पडताळणी गरजेची केलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी या आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या नाही त्यांना 18व्या हप्त्याचे 2 हजार रुपये मिळणार नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी आपली कामे पूर्ण करून घ्यावीत, असे आवाहन देखील शासनामार्फत करण्यात आले आहे.

ई-केवायसी प्रक्रिया कशी करावी?-

ई-केवायसी प्रक्रिया ही आता खूप सोपी झालेली आहे. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने सुरू केलेल्या पीएम किसान मोबाईल ॲपमध्ये ‘फेस ऑथेंटिकेशन फीचर’ उपलब्ध आहे. या फिचरच्या माध्यमातून शेतकरी आता घरी बसून OTP किंवा फिंगरप्रिंटशिवाय चेहरा स्कॅन करून ई-केवायसी करू शकतात. म्हणजेच दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी ही पद्धत अतिशय सोयीचे आहे.

तसेच शेतकरी त्यांच्या जवळच्या CSC सेंटरला जाऊन देखील बायोमेट्रिक केवायसी करु शकतात. जर शेतकरी स्वतः OTP द्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करत असतील तर ते विनामूल्य आहे. जर शेतकऱ्यांनी CSC सेंटरला जाऊन केवायसी केली तर काही शुल्क द्यावे लागणार आहे.

जर तुमच्या खात्यात 2 हजार रुपये जमा झाले नसतील तर अशी करा तक्रार-

जर पैसे खात्यात जमा झाले नसतील तर सर्वात अगोदर आपल्या क्षेत्रातील लेखापाल किंवा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा व त्यांना याबद्दल माहिती द्यावी. जर या लोकांनी आपले म्हणणे ऐकले नाही तर आपण त्यासाठी हेल्पलाइन नंबरवर देखील कॉल करू शकता.

त्याचबरोबर सोमवार ते शुक्रवारच्या मध्ये पीएम किसान हेल्प डेस्कच्या pmkisanict@gov.in या ई-मेलवर संपर्क करू शकता. जर इथेही काही प्रतिसाद नाही मिळाला तर आपण 011 23381092 या हेल्पलाइन नंबरवरही कॉल करू शकता. तुमच्या खात्यात 2 हजार रुपये जमा झाले नसतील तर ऑनलाईन तक्रार करण्यासाठी येथे क्लिक करा.

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *