लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ज्या बहिणीने ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये अर्ज केलेले होते परंतु एकही रुपया त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नव्हता अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कालपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. या योजनेच्या माध्यमातून अशा लाडक्या बहिणींच्या खात्यात 4500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की हे पैसे लाडक्या बहिणींना आता 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत मिळणार आहेत.
ज्या बहिणींच्या खात्यात काल पैसे जमा झालेले नसतील त्या बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. अशा बहिणींनी 30 सप्टेंबरपर्यंत वाट पहावी. तोपर्यंत तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. ज्या बहिणीला आत्तापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही अशा बहिणींना 4500 रुपये देण्यात येत आहेत. ज्या बहिणींच्या खात्यात या अगोदर 3000 रुपये जमा झालेले आहेत त्या बहिणींना आता 1500 रुपये मिळणार आहे. हे पैसे 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत.
परंतु त्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाचे काम करणे गरजेचे आहे. पहिले म्हणजेच तुमचा अर्ज मंजूर असणे गरजेचे आहे व दुसरे म्हणजे तुमचे बँक खाते हे आधार कार्डशी DBT लिंक असणे गरजेचे आहे. तसेच ते चालू असणे गरजेचे आहे. तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे. जर तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन एका दिवसांमध्ये तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक करू शकता व येणारे पैसे हे तुम्ही पोस्टमध्ये देखील घेऊ शकता.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.