ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ‘ग्रामपंचायत अधिकारी’ असा नाम उल्लेख.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत (दि. 23 सप्टेंबर) राज्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पदाचे एकत्रिकरण करून या पदाचे नाव ‘ग्रामपंचायत अधिकारी’ असे करण्यात यावे यासाठी मान्यता देण्यात आलेले आहे. तसेच त्या बाबतीतील शासन निर्णय देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी या पदाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी शासन व जनता यांना जोडणारे व प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेचे महत्त्वाचे पद व घटक आहे.

तसेच ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी हे ग्रामपंचायतीचे सचिव व ग्रामसभेचे पदसिद्ध सचिव म्हणून काम पाहतात. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी या दोन्ही पदांच्या कामाचे स्वरूप एक असल्यामुळे ही दोन्ही पदे एकत्र करून एकच पद निर्माण करण्याबाबत शासन निर्णय समितीने घेतलेला आहे. सदर समितीच्या अहवालानुसार ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करून प्रशासनाच्या दृष्टीने सक्षम असे ‘ग्रामपंचायत अधिकारी’ असे नामकरण करण्याची बाब शासनाच्या विचारात होती.

ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पदाचे एकत्रीकरण करून ‘ग्रामपंचायती अधिकारी’ पद!-

ग्रामविकास विभागाच्या आराखड्यातील ग्रामसेवक(एस-8) व ग्रामविकास अधिकारी(एस-12) ही दोन्ही पदे एकत्र करून एस-8(25500-81100) या वेतन श्रेणीतील ग्रामसेवक हे मूळ पद कायम ठेवून या पदाचे नाव ‘ग्रामपंचायत अधिकारी’ करण्यात आलेले आहे. सध्या स्थितीला असलेल्या ग्रामविकास अधिकारी या पदाचे वेतन संरक्षित करून ही पदे मृत संवर्गामध्ये वर्गीकृत करून त्यानंतर रिक्त होणाऱ्या या पदांवर ग्रामपंचायत अधिकारी हे नाव असणाऱ्या एस-8 वेतन श्रेणीतील एकाच पदावर नवीन नियुक्ती करण्यात येणार आहे.

सुधारित सेवांच्या माध्यमातून ग्रामपंचायत अधिकारी या पदास प्रगती योजनेच्या माध्यमातून 10 वर्षाच्या सेवेनंतर पहिला लाभ विस्तार अधिकारी एस-14(38600-122800), 20 वर्षाच्या सेवेनंतर दुसरा लाभ सहायक गट विकास अधिकारी एस-15(41800-132300) व 30 वर्षाच्या सेवेनंतर तिसरा लाभ गट विकास अधिकारी एस-20(56100-177500) यानुसार देण्यात येणार आहे. ग्रामपंचायत अधिकारी या पदाची पदोन्नती साखळी सुधारित होत असल्याने सदर शासन निर्णय प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून त्या सुधारित पदोन्नती पदोन्नती साखळीनुसार आश्वासित प्रगती योजनेचे लाभ चालू होती.

परंतु प्रत्यक्षात अदा न करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सदर शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत पूर्वीच्या अनुज्ञेय पदोन्नती साखळी प्रमाणे लाभ देण्यात यावेत व त्यानंतरचे लाभ सदर शासन निर्णयाप्रमाणे सुधारित वेतन संरचनेमध्ये वेतन निश्चित करून अदा करण्यात येतील. सदर ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची सध्या असलेली सेवा जेष्ठता विचारात घेऊन त्यानुसार एकत्रित पदासाठी सेवा जेष्ठता यादी नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर तयार करावी.

यामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या सेवा जेष्ठमधे बदल होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करून ‘ग्रामपंचायत अधिकारी’ हे पद निर्माण केल्यामुळे आवश्यकतेनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम 1967 मध्ये यथावकाश सुधारणा करण्यात येईल.

ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करून सदर पदाचे नामकरण ‘ग्रामपंचायत अधिकारी’ करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *