आज आपण सदर लेखातून शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाची त्याचबरोबर आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. सोयाबीन व कापूस अनुदान अर्ज हे सुरू झालेले आहेत. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया अनुदानाचा फॉर्म कुठे भरायचा, फॉर्म मध्ये काय काय माहिती भरायची याबद्दलची सविस्तर माहिती.
सदर अनुदानाची माहिती-
सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत शासनाच्या माध्यमातून अनुदान अर्ज भरण्यास चालू झालेले आहेत. राज्यातील सन 2023 च्या खरीप हंगामातील ई-पीक पाहणीवरील नोंदीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे.
या अर्थसाहयाचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाच्या म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. अर्ज भरताना संमती पत्राचा नमुना व ना हरकत पत्राचा नमुना हा जोडून द्यावा लागणार आहे.
खाली दिलेल्या PDF मधून संमती पत्राचा नमुना व ना हरकत पत्राचा नमुना डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढावी. तसेच PDF मध्ये सामायिक खाते प्रमाणपत्र देखील देण्यात आलेले आहे. जर कोणी शेतकरी सामायिक खातेदार आहेत त्यांनी हे सामायिक खाते प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे.
सदर योजनेचा अर्ज कोठे करावा-
या योजनेचा अर्ज हा कृषी सहाय्यक अधिकाऱ्याकडे जमा करावा.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.