शेतकऱ्यांसाठी खुशखबर… सोयाबीन व कापूस शेतकऱ्यांना मिळणार 10 हजार रुपये अनुदान. कोणकोणते शेतकरी असणार पात्र.

आज आपण सदर लेखातून शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची त्याचबरोबर आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्य शासनाकडून कापूस व सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी 5 हजार रुपये एवढी मदत जाहीर करण्यात आलेली आहे. तसेच याबाबतीतील शासन निर्णय देखील काढण्यात आलेला आहे. ही मदत कापूस व सोयाबीनला 2 हेक्टरच्या मर्यादेत मिळणार आहे म्हणजेच एका शेतकऱ्याला 2 हेक्टरसाठी 10 हजार रुपये मिळणार आहेत.

जर 20 गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र असेल तर किमान 1 हजार रुपये मिळणार आहेत, असे शासनाच्या आदेशात म्हटले आहे. अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादित 5 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून शेतकरी ही मदत केव्हा मिळणार आहे याची वाट पाहत होते. परंतु आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. सरकारने 29 जुलै रोजी या मदतीच्या वाटपाला मंजुरी देताना शासन आदेश काढलेला आहे.

कोणते शेतकरी असतील पात्र-

ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023 मध्ये कापूस व सोयाबीन पीक घेतले होते व त्याची नोंदणी ई-पीक पाहणे किंवा पोर्टलवर केली होती ते शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. याचा अर्थ असा की ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023 मध्ये आपल्या सोयाबीन व कापूस पिकाची ई-पीक पाहणी केली आहे असे शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. ई-पीक पाहणीवर जेवढ्या क्षेत्राची नोंदणी केलेली असेल तेवढ्याच पिकासाठी ही मदत मिळणार आहे.

कशी मिळणार मदत?-

0.2 हेक्टर म्हणजेच 20 गुठ्यांपेक्षा कमी असेल तर सरसकट 1 हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केलेली आहे. त्याचबरोबर जर 20 गुंठ्यापेक्षा जास्त क्षेत्र असेल तर त्या उत्पादकांना त्यानुसार मदत मिळणार आहे. जर एखाद्या शेतकऱ्याचे क्षेत्र हे 1 एकर असेल तर त्याला 2 हजार रुपये मिळणार आहेत. ही रक्कम शेतकऱ्याच्या थेट खात्यात जमा होणार आहे.  

शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार?-

राज्यातील कापूस उत्पादकांना मदत देण्यासाठी 1 हजार 548 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर सोयाबीन उत्पादकांसाठी 2 हजार 646 कोटींची मदत दिली जाणार आहे. म्हणजेच राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादकांना 4 हजार 194 कोटी रुपये मदत दिली जाणार आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *