आधार कार्ड वरील नाव, लिंग, वाढदिवसाची जन्माची तारीख व पत्ता किती वेळा बदलता येतो. बदलण्याची मुभा आहे. जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. युनिक आयडेंटिफिकेशन अथोरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI ने आधारकार्ड संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया आधार कार्ड वरील नाव, वाढदिवसाची तारीख, लिंग व पत्ता या गोष्टी नेमक्या किती वेळा बदलता येऊ शकतात.

  • नाव- युआयडीएच्या म्हणण्यानुसार आधारकार्ड वरील नाव जास्तीत जास्त दोन वेळा बदलता येऊ शकते, असे यूआयडीने म्हटले आहे.
  • लिंग- आधार कार्ड वरील रेकॉर्ड मध्ये सेक्स म्हणजे व्यक्ती महिला आहे की पुरुष आहे हे फक्त एकदाच बदलण्याची मुभा देण्यात आलेली आहे.
  • वाढदिवसाची तारीख- आधारकार्डवर नोंद असलेली डीओबी म्हणजेच वाढदिवसाची तारीख बदलण्यासाठीही मर्यादा आहे. आधार कार्ड वरील वाढदिवसाची तारीख ही त्या व्यक्तीला आयुष्यात एकदाच बदलण्याची मुभा देण्यात आलेली आहे.
  • पत्ता- आधारकार्डवर पत्ता बदलण्यासाठी कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही. म्हणजेच आपण कितीही वेळा तो बदलू शकतो.

आधारकार्डवरील या गोष्टी फार कवचित बदलल्या जात असल्यामुळे ही मर्यादा घालण्यात आलेली आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *