मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळणार: लाडक्या बहिणींसाठी GR आला.

आज आपण सदर लेखातून लाडक्या बहिणींसाठी आनंदाची त्याचबरोबर महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. या योजनेचा लाभ हा लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळण्यासाठी होणार आहे. त्याचबरोबर या योजनेचा लाभ प्रधानमंत्री उज्वला योजनेतील 52 लाख 16 हजार लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.

सदर योजनेच्या अटी-

  • या योजनेच्या लाभास पात्र ठरण्यासाठी त्या महिलेच्या नावाने गॅस जोडणी कनेक्शन असावे.
  • या योजनेसाठी एकाच कुटुंबात फक्त एकच लाभार्थी महिला पात्र असणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून एका महिन्यात एकापेक्षा जास्त गॅस सिलेंडर मिळणार नाहीत.
  • या योजनेचा लाभ फक्त 14.2 किलो वजनाच्या गॅस सिलेंडरच्या जोडणीसाठी  गॅस धारकांना मिळणार आहे.
  • ज्या महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत अशा महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
  • या योजनेचा लाभ प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या 52.16 लाख महिलांना दिला जाणार आहे.
  • म्हणजेच केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेचा माध्यमातून लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असणार आहेत.
  • ज्या शिधापत्रिका 1 जुलै 2024 नंतर विभक्त करण्यात आलेल्या आहे असे शिधापत्रिका धारक या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.

सदर योजनेचे वैशिष्ट्ये-

  • या योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना तीन मोफत सिलेंडरचे पैसे देण्यात येणार आहेत व त्याचबरोबर प्रत्येक लाभार्थ्याचा आधार लिंक केला जाणार आहे.
  • या योजनेत माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचा ही समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यात सध्या 3 कोटी 49 लाख कुटुंबांकडे घरगुती गॅस सिलेंडर जोडणी आहे.
  • तसेच उज्वला योजनेतील 52 लाख 16 हजार 412 लाभार्थी कुटुंबांना केंद्राच्या 300 रुपये अनुदानावरील रक्कम राज्य सरकार देणारा असून त्यासाठी वार्षिक 830 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतील कुटुंबांना या योजनेचा लाभ देताना एका कुटुंबात एका शिधापत्रिकेवर कितीही महिलांची नोंद असली तरी महिन्याला एकच मोफत सिलेंडर दिला जाणार आहे.
  • जर गॅस जोडणी कनेक्शन हे महिलांच्या नावे असेल तरच लाभ दिला जाणार आहे. या अटीमुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ साधारणत: अडीच कोटी महिलांना देण्याची सरकारने मान्यता दिलेली आहे. परंतु मोफत गॅस सिलेंडर साधारणत: दीड कोटी कुटुंबांना मिळणार आहे.  

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • गॅस जोडणी प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • ओळखपत्र
  • त्याचबरोबर लाडकी बहीण योजना नोंदणी व उज्वला या योजनेची आदी कागदपत्रे असावीत.

सदर योजनेच्या माध्यमातून बँक खात्यात किती रक्कम येणार?-

  • सध्या केंद्र सरकार उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्य्मातून पात्र महिला लाभार्थ्यांना 300 रुपये अनुदान देते. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार त्यांच्या खात्यात आणखी 530 रुपये जमा करणार आहे.
  • तर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार असल्याने त्यांच्या बँक खात्यात प्रति सिलेंडर 830 रुपये जमा करण्यात येणार आहेत.

सदर योजनेची अर्ज करण्याची पद्धत-

राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची अधिकृत वेबसाईट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु पात्र अर्जदार हे अधिकृत वेबसाईट किंवा शासन निर्णय पाहून योजनेची माहिती घेऊ शकतात. तसेच सरकारने अधिकृत वेबसाईट जाहीर केल्यानंतर तेथे जाऊन फॉर्म भरू शकतात.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *