पीएम किसान योजनेच्या नावाने संदेश आलाय! थांबा! फेक लिंक मधून होत आहे मोबाईल हॅक…

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. जर तुम्हाला ‘पीएम किसान: लीस्ट एपीके फाईल’ या नावाचा संदेश व्हाट्सअपद्वारे आलेला असेल तर तो ओपन करू नका. कारण अशा फाईल पाठवून संबंधित व्यक्तीचे व्हाट्सअप हे हॅक केले जात आहे व त्याचबरोबर मोबाईल मध्ये असलेले बँकिंग अॅप व ऑनलाईन पेमेंट अ‍ॅप याची माहिती मिळवून आर्थिक फसवणूक केली जात आहे. असे प्रकार वाढत असल्यामुळे सायबर पोलिसांनी नागरिकांना विशेषत: शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेच्या नावाखाली आलेले अनोळखी संदेश ओपन करून पाहू नये, असा सल्ला दिलेला आहे.

वेगवेगळ्या सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आपला मोबाईल क्रमांक टाकाव लागत आहे. त्यामुळे योजनांचे संदेश शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर येतात. यातील बरेचसे संदेश हे किसान(KISAAN) या नावाने येतात. त्यामुळे ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने याच नावाचा वापर करून शेतकऱ्यांना ‘टार्गेट’ करण्याचे ठरवले आहे, असे दिसून येत आहे. त्यामुळे सायबर पोलिसांनी असे आवाहन केले आहे की जर ‘पीएम किसान: लीस्ट एपीके फाईल’ असा संदेश व्हाट्सअप वर आला तर त्याच्यकडे लक्ष देऊ नये.

व्हाट्सअपद्वारे ‘पीएम किसान: लिस्ट एपीके फाईल’ पाठविल्या जात आहेत. जर याबाबत लिंकवर क्लिक केले तर संबंधित व्हाट्सअप हॅक होत आहे. बँकिंग अ‍ॅप,  गुगल पे, फोन पे, अ‍ॅमेझॉन पे यांचे डीटेल्स व अ‍ॅक्सेस हॅकर मिळअत आहे. त्यामुळे त्यांच्या बँक खात्यातील पैसे कपात होत आहेत, असे प्रकार अनेक ठिकाणी वाढत असल्यामुळे नागरिकांनी आधीच काळजी घ्यावी.

सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू आहे. या योजनेच्या नावे अनोळखी दूरध्वनी अथवा एसएमएस येऊन फसवणूक होऊ शकते. त्यामुळे अशा दूरध्वनी किंवा एसएमएसला उत्तर देऊ नये. असे सायबर विभागाने आव्हान केले आहे.

याकडे लक्ष द्या-

  • आपल्या मोबाईल मधील इन्स्टॉल अननोन अ‍ॅपला परवानगी देऊ नका. सोर्स सेटिंग बंद करा.
  • ओळखी व्यक्तीकडून आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. ती शेअर करू नका.
  • पीएम किसान बरोबरच बँकांच्या नावाने आलेल्या एपीके फाईल या डाऊनलोड करू नका.
  • आपल्या व्हाट्सॲप प्रायव्हसी सेटिंगमध्ये जाऊन टू स्टेप व्हेरिफिकेशन करून घ्या.
  • आपल्या बँक खात्याचे डिटेल्स, ओटीपी कोणाकडेही शेअर करू नका.
  • आर्थिक फसवणूक झाल्यास 1930 या टोल फ्री क्रमांक तातडीने कॉल करा.

फसवणूक झाल्यास काय करावे-

फसवणूक झाल्यास 1930 या टोल फ्री क्रमांक वर तातडीने कॉल करावा. सुरुवातीच्या दोन ते तीन तासाच्या आत या क्रमांकावर जर कॉल केला तर खात्यातून गेलेली रक्कम थांबून ठेवता येते व ती रक्कम परतही मिळवता येऊ शकते. तसेच सायबर क्राईम डॉट जीओव्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरती लेखी तक्रार देखील करता येते. संबंधित बँकेलाही याबाबतची माहिती देऊन खात्याचे सर्व व्यवहार थांबून ठेवता येतात, असे दयानंद पाटील हे म्हटले आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *