जी धरणे पुणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करतात त्या धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडलेला आहे. त्यामुळे पुण्यातील चारही धरणांमध्ये 80 टक्के पेक्षा अधिक पाणीसाठा झालेला आहे. पुण्यातील चारही धरणे मिळून 86.51 टक्के इतका पाणीसाठा जमा झालेला आहे.
त्यामुळे पुणेकरांसाठी ही आनंदाची व त्याचबरोबर समाधानाची बाब आहे. मागील वर्षी याच काळात 74.17 टक्के इतका पाणीसाठा होता. यावेळी चांगला पाऊस झाल्यामुळे धरण क्षेत्रातील साठ्यात वाढ झालेली आहे. पुण्याला जी धरणे पाणीपुरवठा करतात त्या धरणांमध्ये 25.22 टीएमसी पाणी जमा झालेले आहे.
पुण्याला चार प्रमुख धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांचा समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या धरणात किती पाणीसाठा झालेला आहे.
पुण्यातील धरणातील पाणीसाठा-
खडकवासला- 86.24 टक्के
पानशेत- 94.99 टक्के
वरसगाव- 81.46 टक्के
टेमघर- 80.03 टक्के
सतर्क राहण्याचे आव्हान-
मिळालेल्या माहितीनुसार खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग आता वाढवण्यात येणार आहे. नदीपात्रातील निषिद्ध क्षेत्रात उतरू नये अशा सूचना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिल्या आहेत. सखल भागातील नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये असे देखील प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे.
मुठा नदी मध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईकरांना देखील दिलासा-
मागील काही दिवसात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये देखील चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. आजपासून 10 टक्के पाणी कपातीचा निर्णय रद्द करण्यात आलेला आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी देखील ही आनंदाची बातमी आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.