सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर चांगलाच पाऊस पडताना दिसून येत आहे. त्यामुळे पानशेत व खडकवासला धरणाच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पाटबंधारे विभागाने मुठा नदीकाठी असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच नदीपात्रात असलेल्या वस्तू व जनावरे सुरक्षित ठीकाणी हलवण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत.
पानशेत धरणाच्या पाणी पातळी मध्ये वाढ होत असल्यामुळे व पाणलोट क्षेत्रातील अति पर्जन्यामुळे धरणातून होणारा विसर्ग वाढवून रात्री 10 वाजता 7688 क्यूसेक करण्यात आलेला आहे. तसेच पावसाच्या येण्यानुसार विसर्ग कमी जास्त देखील करण्यात येणार आहे. तर नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये व जर साहित्य अथवा जनावरे नदीपात्रात असतील तर तात्काळ हलविण्यात यावीत असा इशारा देण्यात आलेला आहे.
खडकवासला धरणाच्या सांडव्यातून मुठा नदीपात्रामध्ये होणारा विसर्ग 28 जुलै व 29 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजता वाढवून 13 हजार 981 क्यूसेक करण्यात आलेला आहे. पावसाच्या येण्यानूसार या विसर्गात वाढ देखील करण्याची शक्यता आहे, असा इशारा मुठा कालवा पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांनी दिला आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.