शेतकामासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरच्या टायरमध्ये पाणी का भरले जाते?

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. अनेक वेळा शेतकरी शेतात ट्रॅक्टर चालवताना त्याच्या मागील टायर मध्ये पाणी भरतात हे आपण पाहिलेले असेल. चला तर मग जाणून घेऊया हे असे का केले जाते, शेतकरी ट्रॅक्टरच्या टायरमध्ये पाणी का भरतात, ट्रॅक्टरच्या टायर मध्ये पाणी भरण्याच्यामागील कारण काय आहे.

ट्रॅक्टरच्या टायर मध्ये पाणी भरण्याच्या प्रक्रियेला टायर्सची बॅलेस्टींग असे म्हटले जाते. या प्रक्रियेच्या माध्यमातून ट्रॅक्टरच्या टायर मध्ये सुमारे 60 ते 80 टक्के पाणी भरले जाते. यामुळे ट्रॅक्टरचे वजन वाढते व त्या ट्रॅक्टरच्या चाकाची जमिनीवरची पकड ही मजबूत होते. ज्यावेळी ट्रॅक्टरचा वापर हा खूप निसरड्या शेतात किंवा निसरड्या ठिकाणी करणे शक्य होते.

तसेच ट्रॅक्टरचा चाकांची जमिनीवरची पकड कायम राहते व त्याचबरोबर ट्रॅक्टरचे घसरणे देखील कमी होते. जेव्हा शेतात नांगरणी केली जाते किंवा जड उपकरणे उचलण्याच्या वेळी हे तंत्र वापरण्यात येते. कृषी ट्रॅक्टरचे वॉल्व्ह हवा व पाण्याचे असतात. जेव्हा ट्रॅक्टरच्या टायर मध्ये पाणी भरले जाते तेव्हा टायर मधील हवा ही दुसऱ्या वॉल्व्हमधून बाहेर पडते. त्यामुळे ट्रॅक्टर जड होतो व निसरड्या शेतातही मजबूतपणे पकड सहज बनवून ठेवू शकतो.

पाणी साचलेल्या शेतात ट्रॅक्टर चालवताना काय अडचणी येतात-

काही वेळेस ट्रॅक्टर पाणी साचलेल्या शेतात किंवा निसरड्या पृष्ठभागावर चालवावा लागतो. अशा वेळेस हवेने भरलेले टायर हे हलके असल्यामुळे जमिनीवर घसरायला लागतात किंवा एका ठिकाणीच फिरू लागतात. यामुळे ट्रॅक्टर चालवणे हे अवघड होऊन बसते, तेव्हा ट्रॅक्टरच्या टायरमध्ये पाणी भरले जाते. यामुळे ते जमिनीवर मजबूत पकड ठेवू शकतात व निसरड्या शेतातही सहज फिरू शकतात.

ट्रॅक्टर मध्ये पाणी भरण्यामागील शास्त्र काय आहे-

टायर मध्ये पाणी भरल्यानंतर त्याचे वजन वाढते. त्यामुळे ट्रॅक्शन वाढते. ट्रॅक्शन हे घर्षणाशी संबंधित आहे. तर घर्षण हे वजनावर अवलंबून असते. याच कारणामुळे जेव्हा ट्रॅक्टरच्या मागील टायरमध्ये पाणी भरलेले असते. तेव्हा तो ट्रॅक्टर जड होतो व जमीनीवर आपली मजबूत पकड बनवून ठेवू शकतो. याचा अर्थ असा की ट्रॅक्टर अगदी निसरड्या जागेतही सहज हलू शकतो.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *