आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. अमरावती जिल्ह्यामध्ये पुण्यातील रामा फर्टिकेम लिमिटेड नामक कंपनीने जिल्ह्यात डीएपी व एनपीके 10:26:26 या रासायनिक खतांच्या नावे अक्षरशः 47 लाखाची माती विकली आहे. कंपनीची ही फसवेगिरी कृषी विभागाच्या समोर आलेली आहे.
डीएपी या रासायनिक खताची 50 किलोची बॅग 1350 रुपयांना मिळते व एनपीकेची बॅग 1470 रुपयांना बाजारात विकली जाते. याप्रकरणी सोमवारी रात्री शहर कोतवाली पोलिसांनी रामा फर्टिकेम यांचा जबाबदार अधिकारी विकास रघुनाथ नलावडे (48, राहणार- श्रीगोंदा, अहमदनगर) यांच्या विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर अनेक शेतकरी पेरणी सोबतच रासायनिक खतांची देखील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते. अनेक शेतकरी या दोन्ही खते पेरणीच्या वेळी वापरतात. त्यामुळेच या दोन्ही खतांची पेरणीच्या वेळी टंचाई निर्माण होते. दरम्यान शेतकऱ्यांच्या या स्पर्धेचा फायदा रामा फर्टीकेम या उत्पादक कंपनीने घेतला आहे.
जिल्हा कृषी अधिकारी अजय तळेगावकर यांनी दिवसा तालुक्यातील मारडा येथील निलेश कृषी सेवाकेंद्रातून नियमित तपासणीसाठी रासायनिक खतांचे नमुने घेतले. त्यामध्ये रामा फर्टीकेम लिमिटेड वडकी पुणे या कंपनीने उत्पादित डीएपी खताचा नमुना घेतला आणि तो नमुना विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवला. त्यानंतर 25 जूनला हे खत अप्रमाणीत असल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे कृषी अध्यक्ष राहुल सातपुते यांचा नेतृत्वात कृषी उपसंचालक उज्वल आगरकर तसेच कृषी विभागाने जिल्ह्यात कोठे कोठे या कंपनीचे खत विकले याची माहिती घेतली. त्यावेळी नांदगाव, खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील शुभम कृषी केंद्र येथे 10:26:26 हे खत असल्याचे माहिती झाले. कृषी विभागाने त्या ठिकाणी जाऊन नमुने घेतले व प्रयोगशाळेतून तपासणी केली असता या खतांमध्येही आवश्यक घटक नगण्य प्रमाणात असल्याचे समोर आले.
या खतांवर केंद्र सरकारच्या योजनेचा ब्रँड-
सदर कंपनीच्या खताच्या बॅगवर प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक परियोजना या केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या ब्रँडच्या नावाने छपाई करून विकले आहे. त्यामुळे यातुन शासन व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे दिसून येत आहे.
खतांमध्ये हे घटक आवश्यक-
डीएपी नत्र 18 ट्क्के व स्फुरद 46 टक्के आवश्यक आहे. मात्र रामा फर्टीकेमच्या जिल्ह्यातील साठ्यात अर्धा टक्क्यांपेक्षा हे घटक कमी असून उर्वरित सर्व माती किंवा मातीसारखा घटक होता. तसेच 10:26:26 मधे सुद्धा नत्र 10 टक्के व स्फुरद आणि पोटॅश प्रत्येकी 26 टक्के गरजेचे आहे. मात्र ते सुद्धा मातीच होते असे विश्लेषणातून समोर आल्याचे जिल्हा कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी सांगितले आहे. या प्रकरणात कंपनीसह विक्रेत्यांवरही कारवाई होणार आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.