मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना

आज आपण सदर लेखातून आनंदाची त्याचबरोबर महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. शासनाने पुढील पाच वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याबाबत GR काढलेला आहे. ही योजना एप्रिल 2024 ते मार्च 2029 या दरम्यान लागू केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मागील तीन महिन्याचे बिल भरण्याची गरज नाही.

सरकारने अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने हा GR काढण्यात आलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून जे शेतकरी 7.5 एचपी म्हणजेच अश्वशक्तीपर्यंत कृषी पंप वापरतात त्या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे. या योजनेचा फायदा हा 44 लाख 3 हजार शेतकऱ्यांना होणार आहे.

तीन वर्षानंतर या योजनेचा घेण्यात येणार आढावा-

तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर या योजनेचा आढावा घेण्यात येणार आहे. तीन वर्ष पूर्ण झाले की या योजनेचा आढावा घेतला जाईल व पुढील कालावधीत योजना पुढील कालावधीत राबवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, असा GR मध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करताना हा निर्णय उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित दादा पवार यांनी जाहीर केला आहे.

सरकारला वीज बिलाचे भरावे लागणार 14761 कोटी रुपये-

महावितरण खात्याला सरकारला या बिलाचे 14761 कोटी रुपये एवढी रक्कम द्यावी लागणार आहे. कृषी पंप विज बिलाची एकूण थकबाकी ही 50 हजार कोटी रुपये इतकी आहे. या वीज बिल माफीसाठी जो खर्च येणार आहे तो खर्च राज्य सरकार उचलणार आहे. म्हणजेच सरकारला दरवर्षी महावितरणाला 14 हजार 761 कोटी रुपयांचे अनुदान द्यावे लागणार आहे.

आपल्या राज्यात मार्च 2024 अखेरपर्यत47.41 लाख एवढे कृषीपंप ग्राहक शेतकरी आहेत. म्हणजेच एकूण वीज ग्राहकांचा तुलनेत हे प्रमाण 16 टक्के आहे व 30 टक्के वीज कृषीपंपांसाठी वापरण्यात येते. कृषी ग्राहकांचा सध्या स्थितीचा एकूण वार्षिक वीज वापर हा 39 हजार 246 दशलक्ष युनिट आहे. राज्यातील कृषी पंपांसाठी रात्री 8/10 तास किंवा दिवसा 8 तास वीजपुरवठा करण्यात येतो.

या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ-

जे शेतकरी कृषी पंप हा 7.5 एचपी पर्यंत वापरतात त्यांनाच मोफत वीज देण्यात येणार आहे. याचा अर्थ असा की जे शेतकरी 7.5 एचपीपेक्षा कमी क्षमतेचे कृषी पंप वापरतात त्यांना मोफत वीज देण्यात येणार नाही. फक्त 7.5 एचपी पंपासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जे शेतकरी 7.5 एचपी पेक्षा जास्त क्षमतेचे कृषी पंप वापरतात त्या शेतकऱ्यांना देखील वीज बिल भरावे लागणार आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *