कांदा उत्पादकांना दिलासा! राज्यातील या चार जिल्ह्यांमध्ये कांदा महाबँक सुरू करण्याचे निर्देश.

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कांद्याची नासाडी रोखण्यासाठी व कांद्याच्या साठवणुकीसाठी महाराष्ट्रात अणुऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. हा प्रकल्प राज्यातील नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिले आहेत.

कांदा हे लवकर खराब होणारे पीक असल्यामुळे अणुऊर्जेच्या माध्यमातून त्यावर प्रक्रिया करून त्या कांद्याची साठवणूक करणे शक्य होणार आहे. यामुळे कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना या कांदा बँकेचा फायदा हा मोठ्या प्रमाणात होणार आहे. या प्रकल्पाची सुरुवात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथून होणार आहे. त्यामुळे संकल्पना आता प्रत्यक्षात येत आहे.

येथे हिंदुस्तान ऍग्रो संस्थेच्या माध्यमातून कांद्याची बँक सुरू करण्यात येणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. कांद्याचे उत्पादन हे ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात होते अशा ठिकाणी म्हणजेच नाशिक, छत्रपती संभाजी नगर, सोलापूर येथे विकरण प्रक्रिया केंद्र उभारून कांद्याची महा बँक लवकरात लवकर सुरु करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले आहेत.

यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागांचा वापर करण्यात येणार आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच समृद्धी महामार्गालगत सुमारे 10 ठिकाणी कांद्याच्या बँक करण्यासाठी प्रस्तावित असलुआमुळे त्यांच्या कामाला गती द्यावी निर्देश मुख्यमंत्री बोलताना म्हणाले. हा प्रकल्प शेतकऱ्यांचा हिताचा असून कांद्याच्या बँकेमुळे कांद्याची साठवणूक करणे शक्य होणार आहे. यामुळे कांद्याला चांगला भाव मिळाल्यानंतर त्या कांद्याची शेतकऱ्यांना विक्री करता येणार आहे.

त्यामुळे याचा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून हा प्रकल्प राबवण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था यांच्या माध्यमातून प्रकल्पाची अमंलबजावणी करण्यात यावी जेणेकरून शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून काम होईल, असे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर कांदा बँक परिसरात मूल्य साखळी विकसित करण्यात यावी, असे देखील ते म्हणाले.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *