आता जमिनीचेही बनणार आधार कार्ड: काय आहे ‘भू-आधार’? जाणून घेऊया सविस्तर माहिती.

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ग्रामीण व शहरी भागातील लँड रिफॉर्म्र्ससाठी केंद्र सरकारने सर्वसाधारण अर्थसंकल्प 2024-25 मध्ये ग्रामीण व शहरी भागासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे.

यामध्ये ग्रामीण भागातील जमिनींसाठी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर किंवा ‘भू-आधार’ व सर्व नागरिक जमिनींच्या नोंदीचे डिजिटलायझेशन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. येत्या तीन वर्षात लँड रिफॉर्म्र्स पूर्ण करण्यासाठी सरकार राज्यांना आर्थिक मदत करणार आहे. यामुळे जमिनीच्या मालकी स्पष्ट होतील व जमिनीच्या संबंधित वादही संपण्यास मदत मिळेल.

भू-आधार म्हणजे काय?-

या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्व जमिनींना 14 अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर दिला जाणार आहे. ज्यालाच भू-आधार असे म्हणून ओळखले  जाते. यामध्ये जमिनीच्या ओळख क्रमांकासह मालकी व शेतकऱ्यांच रजिस्ट्रेशन, मॅपिंग करण्यात येणार आहे.

यामुळे कृषी कर्ज सहज उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे व इतर कृषी सेवा यामुळे सुलभ होणार आहेत. हा महत्त्वकांक्षी प्रकल्प सरकारने 2008 मध्ये भारतातील भूमी अभिलेखांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी व एकात्मिक भूमी अभिलेखन व्यवस्थापन प्रणाली तयार करण्यासाठी सुरू केला होता.

जीआयएस मॅपिंग शहरांमध्ये होणार-

शहरी भागातील जमिनीच्या नोंदीचे डिजिटलायझेशन हे जीआयएस मॅपिंगद्वारे केले जाणार आहे. यासाठी मालमत्ता अभिलेख प्रशासन, अपडेशन व टॅक्स प्रशासनासाठी आयटी आधारित प्रणाली उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर यामुळे नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक स्थिती सुधारण्यास देखील मदत मिळणार आहे.

भू-आधार कसे काम करते-

  • या माध्यमातून प्रथम जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो म्हणजेच भूखंडाचे नेमके भौगोलिक स्थान ओळखण्यासाठी याचा वापर करण्यात येतो.
  • सर्व्हर प्रत्यक्ष पडताळणी करून भूखंडाच्या हद्दी मोजतात.
  • भूखंडासाठी जमीन मालकाचे नाव, वापराची श्रेणी, क्षेत्रफळ इत्यादी तपशील गोळा केले जातात.
  • ही गोळा केलेली सर्व माहिती भूमी अभिलेख प्रणालीत टाकली जाते.
  • या प्रणालीच्या माध्यमातून भूखंडासाठ आपोआपच 14 अंकी भू-आधार क्रमांक तयार कतते व तो डिजिटल रेकॉर्डशी जोडण्यात येतो.

भू-आधार कार्डचे फायदे-

  • या माध्यमातून भू-स्तरीय मॅपिंग व मोजमापाद्वारे अचूक जमिनीच्या नोंदी सुनिचित करता येते.
  • या माध्यमातून भूखंडाच्या ओळखीतील संदिग्धता दूर होते. ज्यामुळे बऱ्याच वेळा जमिनीचे वाद होतात.
  • तसेच या माध्यमातून जमिनीच्या नोंदी आधाराशी लिंक करून ऑनलाईन करता येतात.
  • या माध्यमातून भूखंडाशी संबंधित संपूर्ण इतिहास व मालकी तपशील हा ट्रॅक करता येईल.
  • या माध्यमातून धोरण आखण्यासाठी सरकारला जमिनीचची अचूक आकडेवारी देखील मिळते.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *