आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ऑक्टोबर महिन्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता हा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पीएम किसान सन्माननिधी योजनेच्या नियमांमध्ये नुकताच एक मोठा बदल झालेला आहे.
आता पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना पोर्टल किंवा मोबाईल ॲप द्वारे त्यांचा मोबाईल नंबर बदलता येणार आहे. याचा अर्थ असा की जर पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांचा मोबाईल नंबर हा बदलला असेल तर लोक पोर्टलवर जाऊन किंवा मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे त्यांचा मोबाईल नंबर हा चेंज करता येणे शक्य आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया मोबाईल नंबर कसा बदलावा ते थोडक्यात.
मोबाईल नंबर कसा बदलायचा-
- सर्वात अगोदर pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
- त्यानंतर फार्मर्स कॉर्नर या पर्यायावर क्लिक करावे.
- त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर अपडेट करण्याचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे.
- आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर व कॅप्चा कोड त्यामध्ये टाकून सर्चवर क्लिक करावे.
- आता संमती पत्र स्वीकारायचे आहे.
- त्यानंतर तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक असलेला मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल.
- त्या रकान्यात तो OTP भरावा.
- OTP टाकल्यानंतर तुमची सर्व माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.
- तसेच त्याखाली तुम्हाला एक रिकामा बॉक्स दिसेल.
- त्यामध्ये मोबाईल नंबर टाकावा व Get OTP या पर्यायावर क्लिक करावे. आता तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल.
- त्यानंतर त्याची पडताळणी केली जाईल व तुमचा नंबर अपडेट केला जाईल.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.