मुख्यमंत्री योजनादूत भरती 2024, महाराष्ट्र शासनाकडून 50,000 जागांसाठी मेगा भरती.

आज आपण सदर लेखातून मुख्यमंत्री योजना दूत योजनेबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून 50 हजार जागांसाठी ही मेगा भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रात 50 हजार जागांसाठी ही मेगा भरती करण्यात येणार आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे. शासनाकडून या योजनेसाठी 300 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.

या योजनेचा फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रसार तसेच योजनांची प्रसिद्धी करण्यासाठी व योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळावा या दृष्टिकोनातून राज्यभरातून सुमारे 50,000 योजना दूत निवडले जाणार आहेत. ही योजना महाराष्ट्रातील सर्व रहिवाशांसाठी लागू असणार आहे. 

कामे-

निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची सर्व माहिती देण्यात येणार आहे. प्रशिक्षित योजना दूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले कामे पार पाडणे गरजेचे आहे. ग्राम पातळीवरील घोषणा दूतांनी राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसिद्धी करताना यंत्रणाची समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करत रहावे.

प्रत्येक दिवशी दिवसभर केलेल्या संपूर्ण कामाचा विहित नमुन्यातील अहवाल योजनादूत यांना तयार करून तो ऑनलाईन अपलोड करावा लागणार आहे. त्यांना सोपवलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा नियमाबाह्य कामासाठी उपयोग करणार नाही. तसेच गुन्हेगारी स्वरूपाचे व गैरवर्तन देखील करणार नाहीत असे निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला करार संपुष्टात आणण्यात येईल. त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येणार आहे.

पगार-

10 हजार रुपये महिना (प्रवास भत्ता व इतर सर्व भत्तेसहित) म्हणजेच ह्याच 10 हजारांमध्ये तुमच्या प्रवासाचा खर्च व इतर खर्च सुद्धा असेल. त्याचबरोबर निवड झालेल्या उमेदवारांचा 6 महिन्यासाठीचा करार देखील केला जाणार आहे. त्या उमेदवाराला 6 महिने काम सोडता येणार नाही. त्याचबरोबर निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी सुविधांचा लाभ देखील दिला जाणार आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घेणे गरजेचे आहे.

पात्रता-

  • वयोमर्यादा:- 18 ते 35 वयोगटातील उमेदवार
  • शिक्षण पात्रता:- कोणत्याही शाखेचा पदवीधर
  • संगणक ज्ञान आवश्यक.
  • उमेदवाराकडे मोबाईल असणे गरजेचे.
  • उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे.
  • उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे.

कागदपत्रे-

  • आधारकार्ड
  • पदवी पास कागदपत्रे/ प्रमाणपत्र इत्यादी
  • रहिवास दाखला (सक्षम यंत्रणेने वदललेले)
  • वयक्तिक बँक खाते पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • हमीपत्र

या योजनेचा ऑनलाईन अर्ज हा लवकरच सुरू होणार आहे. अर्ज सुरू झाल्यावर लगेच आपणाला लेखातून अपडेट केले जाईल.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *