आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांच्या प्राणाचे बलिदान दिले आहे. त्यांच्या त्या बलिदानाची घरोघरी तिरंगा अभियान आपल्याला सतत जाणीव करून देईल. तसेच राष्ट्र प्रेमाची नवी उभारी देईल. कारण आता हे अभियान लोकचळवळ बनले आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
यंदाही राज्यातील अडीच कोटी घरावरती तिरंगा फडकवला जाणार आहे. त्याद्वारे देश प्रेमाची भावना जागवली जाणार आहे. विविध दुकाने, आस्थापना यांच्यावर देखील तिरंगा हा फडकवण्यात येणार आहे. आपल्या राष्ट्र ध्वजातील तिरंगा रंग केशरी, पांढरा व हिरवा हे रंग त्याग, धैर्य, प्रेम, शांतता व विश्वासाचे प्रतीक आहे. नव्या पिढीत हीच प्रेरणा व विश्वास निर्माण करण्याचे काम हे अभियान करणार आहे. अधिक उत्साहात व जल्लोषात हे अभियान साजरे करून राज्यभरात देशभक्तीचा मळा फुलवणार आहे व देश प्रेमाचा सुगंध वाहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
उपरोक्त विषयान्वये, राज्य शासनाने व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये दिलेल्या सूचनानुसार यावर्षी देखील हर घरी तिरंगा हा उपक्रम दि.13/08/2024 ते 15/08/ 2024 दरम्यान राबवायचा आहे. तरी प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयाने दि.13/08/2024 ते 15/08/2024 दरम्यान सूर्याद्यानंतर राष्ट्रध्वज फडकवणे आणि सूर्यास्तापूर्वी उतरवणे बंधनकारक राहील.
आपल्या तालुक्यातील कार्यक्षेत्रातील सर्व कार्यालये व घरांवर तिरंगा राष्ट्रध्वज ध्वजसंहितेचे पालन करून दि.13/08/2024 ते 15/08/2024 या कालावधीमध्ये राष्ट्रध्वज फडकविण्याच्या सूचना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात. तसेच तिरंगा सेल्फी हा उपक्रम राबविणे येऊन सदर फोटो शासनाच्या या वेबसाईटवर अपलोड करावेत, असे नागरिकांना आवाहन करण्यात आलेले आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.