आज आपण सदर लेखातून लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्य शासनाने एक मोठ्या निर्णयाची घोषणा केलेली आहे. आता माझी लाडकी बहिणी या योजनेच्या माध्यमातून महिलांना 4500 रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया कोणकोणत्या महिला यासाठी पात्र असणार आहेत.
सदर योजनेची माहिती–
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून लाडकी बहीण ही योजना महिला भगिनींना आर्थिकदृष्ट्या बळकट बनवण्यासाठी जाहीर करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना 1500 रुपये इतकी रक्कम एका महिन्यासाठी दिली जाणार आहे.
या महिलांना पहिला हप्ता हा 17 ऑगस्ट रोजी देण्यात येणार आहे. तसेच रक्षाबंधनची ओवाळणी म्हणून दोन महिन्याचे पैसे ह्या पहिल्याच हप्त्यामध्ये देण्यात येणार आहेत. म्हणजेच महिलांना एकूण 3000 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
सदर योजनेच्या माध्यमातून 4500 रुपये कशाप्रकारे मिळणार आहेत व कोणाला मिळणार आहेत?-
ज्या महिला भगिनींनी या अगोदर अर्ज केलेला आहे त्यांना दोन महिन्याची एकूण रक्कम 17 ऑगस्टला 3000 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत.
परंतु ज्या महिलांनी अजून देखील अर्ज केलेले नाहीत व सध्या स्थितीला ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत परंतु त्यांच्या अर्जाला मंजुरी मिळालेली नाही अशा अर्जाला मंजुरी मिळाल्यानंतर 17 ऑगस्ट नंतर तीन महिन्याचे एकूण रक्कम म्हणजेच 4500 रुपये इतकी रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.
याचा अर्थ असा की प्रत्येक महिलेला प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये याप्रमाणे मिळणार आहेत. म्हणजेच एकूण वर्षाला 18,000 रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.