RTEच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची उद्यापासून होणार पडताळणी; पालकांना आजपासून मेसेज येणार.

जे विद्यार्थी शिक्षण हक्क कायद्याच्या माध्यमातून 25% आरक्षण जागा मिळवण्यासाठी पात्र ठरलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी ही मंगळवारपासून (ता. 23) सुरू होणार आहे. त्याबाबत पालकांना आजपासून (ता. 22) मेसेज पाठवले जाणार आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षण अधिकारी यांनी दिली आहे.

सन 2024-25 साठी RTE अंतर्गत प्रवेशासाठी लॉटरीद्वारे जे विद्यार्थी पात्र ठरले आहेत त्यांच्या पालकांना सोमवारपासून (ता. 22) कागदपत्रे पडताळणीसाठी मेसेज पाठवले जाणार आहेत. त्याचबरोबर 23 ते 31 जुलै अखेर पडताळणी समितीकडून कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतरच पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात येणार आहेत.

अर्ज भरताना जी कागदपत्रे प्रवेश पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी नमूद केलेली आहेत, त्यांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रती घेऊन पडताळणीसाठी जाणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अलॉटमेंट लेटरची प्रिंट व RTE पोर्टलवर असलेल्या हमी पत्राची प्रिंटही बरोबर घेऊन जाणे आवश्यक आहे. आपल्या पाल्याचा प्रवेश हा ऑनलाईन निश्चित करून घ्यावा व त्याची रिसीट ही पडताळणी समितीकडून घ्यावे.

प्रवेश पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होतील. परंतु, पालकांनी फक्त एसएमएस वर अवलंबून न राहता RTE पोर्टलवर अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली आहे की नाही याची खात्री करून घ्यावी.

सूचना-

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅबवर अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पाहावा. निवड यादीच्या प्रवेशाची मुदत संपल्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना एसएमएस पाठवले जाणार आहेत.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *