5 रुपये प्रति लिटर गाय दूध अनुदानासाठी अर्ज करण्याची मुदत आता 30 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे.

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. गायीच्या दुधाला 5 रुपये प्रति लिटर अनुदान देण्याबाबत निर्णय शासनाने आता 30 सप्टेंबर पर्यंत चालू राहणार आहे. जे दूध उत्पादक शेतकरी राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करतात त्यांना या अनुदानाचा लाभ घेता येणार आहे.

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सहकारी संघ, खाजगी दूध प्रकल्प, दूध शितकरण केंद्र व दुग्ध व्यवसायाशी संबंधित फार्मर प्रोड्युसर कंपनी यांनी 30 सप्टेंबर पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज हे आयुक्त, दुग्धव्यवसाय विभाग मुंबई यांच्याकडे सादर करणे गरजेचे आहे.

सदर अनुदान योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत?-

  • सहकारी दूध संघ
  • खाजगी दूध प्रकल्प
  • दूध शितकरण केंद्र
  • फार्मर प्रोड्युसर कंपनी (दुग्ध व्यवसायाशी संबंधित)

सदर योजनेच्या अनुदानासाठी आवश्यक गोष्टी-

  • डीबीटीसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते, आधार कार्ड व पशुधनाच्या कानातील बिल्ल्याशी लिंक असणे गरजेचे आहे.
  • जे दूध उत्पादक शेतकरी हे राज्यातील सहकारी दूध संघ किंवा खाजगी दूध प्रकल्पाला दूध पुरवठा करणारे पाहिजेत.
  • सहकारी संघ व खाजगी प्रकल्पांनी शेतकऱ्यांचा डेटा अपलोड करण्यासाठी लॉगिन आयडी व पासवर्ड मिळेल.

अधिक माहितीसाठी संपर्क-

प्रादेशिक दुग्धविकास अधिकारी, अमरावती

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *