विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्याची मुदत

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची त्याचबरोबर आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आता जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्याची मुदत वाढ देण्यात आलेली आहे. म्हणजेच अर्ज दाखल केल्यापासून 6 महिन्याचा वेळ विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

राज्यातील अतिमागास प्रवर्ग, आर्थिक दुर्बल घटक, सामाजिक व आर्थिक मागास व ओबीसी प्रवर्गात पात्र ठरणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींकडून महाविद्यालयात प्रवेशाच्या वेळी आकारण्यात येणारे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात आले आहे. परंतु आरक्षणाच्या माध्यमातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.

त्यातही आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्यां जात वैधता प्रमाणपत्र प्रवेश घेतल्यानंतर 6 महिन्यामध्ये सादर करू शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयानुसार 2024-25 मध्ये अभियांत्रिक वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांक पासून 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

त्यामुळे याचा फायदा विशेषता मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळविण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यास मदत मिळेल. कारण जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आता 6 महिन्याचा अवधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच राज्य सरकारने मोफत उच्च शिक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे आरक्षण प्राप्त व ईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक संस्थांनी हे शुल्क आकारू नयेत असे निर्देश देखील उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून देण्यात आलेले आहेत.

याचे शासन पत्र देखील उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. त्यामुळे जे विद्यार्थी अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेणार आहेत त्यांना याचा लाभ होणार आहे. त्याचबरोबर उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्वच मुलींना प्रवेश परीक्षा शैक्षणिक शुल्क माफ केले जाणार आहे. यामुळे मुलींच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

परंतु उच्च शिक्षणात अभियांत्रिकी, वैद्यकीय व व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपले जात वैधता प्रमाणपत्र महाविद्यालयात प्रवेशावेळी सादर करणे बंधनकारक आहे. परंतु आता राज्य सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण घेणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा मिळणार आहे व ही दिलासा देणारी बाब आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *