आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आज केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सादर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत.
मोदी 3.0 सरकारचा पहिल्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रातील उत्पादकता, रोजगार व कौशल्य विकास, मनुष्यबळ विकास व सामाजिक न्याय, उत्पादन व सेवा, शहरी विकास, ऊर्जा संरक्षण, पायाभूत संरचना, संशोधन व विकास, नव्या पिढीतील सुधारणा इत्यादी बाबींचा समावेश आहे.
त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा देखील करण्यात आले आहेत. या अर्थसंकल्पात कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे. याचा कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मोठा फायदा होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया सदर लेखातून याबद्दलची सविस्तर माहिती.
केंद्रीय अर्थसंकल्पातील कृषी क्षेत्रासाठीच्या घोषणा-
- शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढण्यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवले जाणार आहे. या माध्यमातून शेती पिकांचे सर्वेक्षण, मातीची तपासणी इत्यादी अशा सर्व गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.
- आगामी वर्षात नैसर्गिक शेतीवर भर देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी योग्य ती पावले उचलली जाणार आहेत. पुढील काही वर्षातच एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे.
- देशाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी डाळ व तेलबियांच्या उत्पादनावर भर असणार आहे. तसेच डाळीचे उत्पादन, साठवण व विपणन मजबूत करण्याचे देखील उद्दिष्ट असणार आहे.
- सहा कोटी शेतकऱ्यांचा रेकॉर्ड डिजिटल प्लॅटफॉर्म उभारून डिजिटल करण्यात येणार आहे.
- सोयाबीन व सूर्यफूल बियांची साठवण वाढवण्याची देखील या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेली आहे.
- बदलणाऱ्या हवामानाला तोंड देण्यासाठी 32 पिकांसाठी 109 वाणांची निर्मिती करण्यात येणार आहे व त्यासाठी कृषी संशोधनावर भर दिला जाणार आहे.
- पीएम किसान कार्ड देशातील आणखी पाच राज्यांमध्ये जारी करण्यात येणार आहे.
- कोळंबी शेती व विपणनासाठी वित्तपुरवठा देखील सरकार करणार आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.