केंद्रीय अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा.

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आज केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आहे. संसदेत मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर हा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे. चला तर मग जाणून घेऊया यंदाचा अर्थ केंद्रीय अर्थसंकल्प सामान्य जनतेसाठी काय घेऊन आलेला आहे ते थोडक्यात.

अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे

  • 2 लाख कोटी रुपयांच्या केंद्रीय खर्चाबरोबर 5 वर्षातील 4.1 कोटी तरुणांना रोजगार, कौशल्य व इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी 5 योजना व उपक्रम.
  • शिक्षण, रोजगार व कौशल्यासाठी 1.48 लाख कोटी रुपयांची तरतूद.
  • पहिल्यांदा जे नोकरीसाठी पात्र असणार आहेत त्यांना 15 हजार रुपयांपासून पुढे पगार देण्यात येणार.
  • देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार.
  • मुद्रा कर्ज 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपयांपर्यंत दुप्पट केले जाईल.
  • पंतप्रधान आवास योजनेला ही मुदतवाढ, पीएम आवास योजनेच्या माध्यमातून 3 लाख नवीन घरे बांधण्यात येणार.
  • प्रथमच उत्पादन क्षेत्रातील रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार. याचा 30 लाख तरुणांना फायदा होण्यास मदत मिळणार व सर्व क्षेत्रांमध्ये अतिरिक्त रोजगाराचा अंतर्भाव होईल.
  • पीएम आवास योजना शहरी अंतर्गत शहरांमध्ये राहणाऱ्या 1 कोटी गरिबांना 10 लाख कोटी रुपये खर्चून घरे दिली जातील. तसेच पुढच्या 5 वर्षात 2.5 लाख कोटी रुपयांची केंद्रीय मदत देण्यात येणार आहे.
  • देशाभरातील एक कोटी घरांना 300 युनिट मोफत वीज पुरवठा.
  • नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल उभारण्यात येतील.
  • देशभरात रस्ते बांधणीसाठी 26 हजार कोटी खर्च केला जाईल.
  • 5 वर्षाच्या काळात 20 लाख युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम उद्योग विश्वाच्या गरजांनुसार तयार करण्यात येणार आहे.
  • नव्या कररचनेच्या माध्यमातून 3 लाखापर्यंतच्या उत्पन्नातून करमुक्तता.
  • पेन्शनची मर्यादा ही 15 हजारावरून 25 हजारापर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा फायदा 4 कोटी पगारदार व पेन्शनधारकांना होणार आहे.
  • सोने व चांदीसाठी 6 टक्के तर प्लॅटिनमसाठी 6.5 टक्के कस्टम ड्युटीत घट

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *