आज आपण सदर लेखातून आनंदाची त्याचबरोबर महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली यंदाचा एनडीए सरकारमधील पहिलाच अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये युवकांना नोकरी मिळून देण्यासाठी नवीन योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद देखील करण्यात आलेली आहे.
परंतु कालच्या बजेट मधील सर्वात महत्त्वाचा निर्णय ठरला तो सोने व चांदीवरील सीमा शुल्क कमी करण्याचा. यामुळे सोन्याच्या किमतीत मोठी घट झालेली आहे. त्याचबरोबर मोबाईल चार्जरही स्वस्त झालेले आहेत. जे लोक मोबाईल खरेदी करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी ही दिलासा देणारी बातमी आहे.
तसेच केंद्र सरकारने मोबाईल चार्जरवरील कस्टम ड्युटी 20 टक्क्याहून कमी करून 15 टक्के एवढी केली आहे. यामुळे ग्राहकांना आता मोबाईल फोनवर, चार्जरच्या खरेदीवर 5 टक्के कमी रुपये द्यावे लागणार आहेत. म्हणजेच मोबाईल खरेदीवर 5 टक्क्यांची सूट भारतीय ग्राहकांना मिळणार आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे सोन्याचे भाव तब्बल 3 ते 5 हजारांनी कमी झालेले आहेत. तसेच मोबाईल ही माणसाची गरज बनल्यामुळे मोबाईल खरेदी धारकांनाही आनंदाची बातमी सरकारद्वारे देण्यात आलेली आहे. मोबाईलवर, चार्जरच्या खरेदीवर 5 टक्के एवढी सूट मिळणार आहे.
म्हणजेच उदा. जर तुम्ही 20 हजार रुपयांचा मोबाईल खरेदी केला. तर या अगोदर 20 हजार रुपयांच्या मोबाईलवर 20 टक्के कस्टम ड्युटी लावण्यात येत होती. म्हणजेच 20 हजार रुपयांच्या मोबाईलवर 4 हजार रुपये ड्युटी चार्ज ग्राहकांना द्यावा लागत होता. त्यामुळे तो फोन ग्राहकांना 24 हजार रुपयांना विकत घ्यावा लागत होता. आता सरकारने 5 टक्के कस्टम ड्युटी अजून कमी केल्यामुळे 20 हजार रुपयांचा मोबाईल खरेदीवर ग्राहकाला 5 टक्के सवलत मिळणार आहे.
म्हणजेच 20 हजार रुपयांच्या फोनवर 4 हजार रुपये ड्युटी चार्ज याचा अर्थ असा की 20 हजार रुपये किमतीच्या मोबाईलवर आता 15 टक्केच कस्टम ड्युटी द्यावी लागणार आहे. म्हणजेच 3 हजार रुपये कस्टम ड्युटी.तो मोबाईल ग्राहकांनला 23 हजार रुपयांना घ्यावा लागणार आहे. आता ग्राहकांनची 20 हजार रुपयांच्या स्मार्टफोनच्या खरेदीवर 1000 रुपयांची बचत होणार आहे. जर तुम्ही 10 हजार रुपयांचा मोबाईल खरेदी केला तर तुम्हाला 500 रुपयांचा फायदा होणार आहे.
आता मोबाईल बरोबर चार्जरच्या किमतीत ही 5 टक्के बचत होणार आहे. उदा. एखाद्या चार्जरची किंमत 1000 रुपये असेल तर त्याची कस्टंबर ड्युटी 15% म्हणजेच तो चार्जर तुम्हाला 1150 रुपयांना पडणार आहे. या अगोदर तुम्हाला 200 रुपये अधिक द्यावे लागत होते. परंतु तुम्हाला आता त्या चार्जरच्या खरेदीसाठी 150 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत. म्हणजेच 1000 रुपयांच्या मागे तुमचे 50 रुपयांची बचत होणार आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.