आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारच्या माध्यमातून 6 महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत.
यामध्ये अशा सेविकांसाठी सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येणार आहे. जर ऑनड्युटी असताना अपघात होऊन मृत्यू झाला तर 10 लाखांची मदत देण्यात येणार आहे व ऑनड्युटी असताना कायमस्वरूपी अपंगत्व आले तर 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
त्याचबरोबर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेच्या संदर्भात देखील काही निर्णय घेण्यात आलेले आहेत. पारदर्शकता या योजनेत पारदर्शकता व सर्वाधिक महिलांना याचा लाभ मिळावा यासाठी ही योजना आणखी सुलभ करण्यात आलेली आहे. या योजनेचे लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासाठी काही नियम, अटी व शर्ती शिथिल करण्यात आलेल्या आहेत.
या योजनेची राज्यभर चर्चा होत आहे. परंतु काही तांत्रिक अडचणी असल्याने किंवा कागदपत्रांच्या पूर्ततेच्या संदर्भात काही बदल सुचवण्यात येत आहेत. त्यानुसार काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजने संदर्भातील शासन निर्णय लवकरच काढून तो लागू करण्यात येणार आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील नवीन नियम आणि अटी व शर्ती-
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरण्यात येणार आहे.
- परराज्यामध्ये जन्म झालेला महिलेने जर महाराष्ट्रात राहणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर त्या महिलेला पतीच्या कागदपत्रांवर योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवण्यात येणार आहे व अर्जात काही दुरुस्ती करावी लागणार असेल तर ते देखील सांगितले जाणार आहे.
- ज्या महिला केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेत आहेत. त्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत. परंतु त्यांच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा.
- नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच होणे शक्य नसल्यामुळे त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार तिच्या पतीचे रेशन कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे.
- या योजनेच्या माध्यमातून येणाऱ्या ओटीपीचा कालावधी हा 10 मिनिटांचा करण्यात यावा.
15 ते 19 ऑगस्ट या दरम्यान पहिला हप्ता जमा होणार-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिक सुलभ होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न चालू आहेत. त्यानुसार राज्य सरकारने या योजनेच्या कागदपत्रांमध्ये शिथिलता आणली आहे. आता ग्रामस्तरीय समितीच्या माध्यमातून प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांच्या यादीचे वाचन करून दाखवले जाणार आहे.
विशेष बाब म्हणजे लाभार्थी महिलांची यादी लवकरच जाहीर होणारा असून 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान महिलांना या योजनेचा लाभ योजनेच्या माध्यमातून दोन महिन्याची रक्कम म्हणजे 3 हजार रुपये थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहेत.
सूचना- ज्या महिला भगिनींनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने भरलेला आहे, त्या सर्वांनी आपल्या फॉर्मची एक झेरॉक्स अंगणवाडीमध्ये देणे गरजेच्रे आहे. त्याशिवाय या योजनेचा लाभ मिळणार नाही. कारण या फॉर्मची तपासणी ही अंगणवाडी सेविकांच्या मार्फत होणार आहे म्हणून सर्व पात्र महिलांनी फॉर्म भरून त्याची एक प्रत अंगणवाडीमध्ये नेऊन द्यावी.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.