राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आलेले 6 निर्णय!

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 23 जुलै 2024) रोजी मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया याबद्दलची माहिती.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले 6 निर्णय-

सार्वजनिक आरोग्य-

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान अपघाती मृत्यू झाला तर 10 लाख व  अपंगत्व आले तर 5 लाख रुपये अनुदान दिले जाणार.

पशुसंवर्धन विभाग-

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना पुढे सुरू ठेवणार; मेंढपाळ लाभार्थ्यांना रक्कम थेट खात्यात जमा

सामान्य प्रशासन विभाग (साविस)-

दिव्यांग कर्मचाऱ्यांना 2016 पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू

मदत व पुनर्वसन विभाग-

शेती पिकांचे नुकसान ठरविण्यासाठी अद्यावत प्रणाली लवकरात लवकर विकसित करणार.

सामान्य प्रशासन विभाग-

बृहन्मुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी 51 सदनिका.

महसूल विभाग-

नाशिक जिल्ह्यातील अंबडमध्ये एमआयडीसीसाठी 16 हेक्टर शासकीय जमीन

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *