खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे: त्यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.

पुण्यात रात्रभर जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालेले आहे. अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. त्याचबरोबर काही ठिकणचे जनजीवन देखील विस्कळीत झालेले आहे. या मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे सिंहगड रस्त्यावरील 5 सोसायटीमध्ये पाणी घुसले आहे. त्याच्या मदतीसाठी कोणती ही यंत्रणा आली नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

या जोरदार पावसामुळे पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत. तसेच मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आलेला आहे. रात्री धरणामधून मुठा नदीमध्ये 9 हजार क्युसेक्सने विसर्ग सुरु होता. परंतु तो आता वाढवण्यात आलेला आहे.

खडकवासला धरणामधून सकाळी 6 वाजता मुठा नदीच्या पात्रामध्ये 35574 क्युसेक्सने पाणी विसर्ग सोडण्यात आलेला आहे. तसेच धरण परिसरात 100 मिलिमीटर व घाट माथ्यावर 200 मीटर पेक्षा जास्तपावसाची सरासरी नोंद झालेली आहे. तसेच या पावसामुळे पुणे शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा देखील खंडित झालेला आहे.

शहरातील खालील ठिकाणी त्वरित दक्षता घेण्याच्या सूचना-

भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे.

गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर

शितळा देवी मंदिर डेक्कन.

संगम पूल पूलासमोरील वस्ती

कॉर्पोरेशन जवळील पूल बंद करण्याची दक्षता घ्यावी.

होळकर पूल परिसर

पुणे जिल्ह्यातील शाळा आज राहणार बंद-

हवामान खात्याच्या माहितीनुसार येत्या काही तासात पुणे जिल्ह्यातील खडकवासला परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे या भागातील शाळां 25 जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन  प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी दिले दिले आहेत. खडकवासला धरणातून 40 हजार क्युसेक विसर्ग सुरू होत आहे. त्यामुळे पुणे शहराच्या सखोल भागात पाणी साचू शकते. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉक्टर दिवसे यांनी नागरिकांना दक्षता बाळगावी व गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे आव्हान केले आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *