आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा.

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. हवामान खात्याचा अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अ‍ॅरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे व काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे. मुंबईत पहाटेपासून रिमझिम पाऊस पडत आहे. ठाणे, पालघर, रायगड रत्नागिरी जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *