आता जमिनीची अचूक मोजणी होणार फक्त 1 तासात.

आज आपण सदर लेखातून शेतकऱ्यांसाठी आनंदाची तसेच महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आता शेतकऱ्यांची जमीन मोजणीची चिंता मिटली आहे. कारण आता एका तासात जमिनीची अचूक मोजणी होणार आहे. शेतकऱ्यांना आपल्या जमीन मोजण्याची वेळोवेळी गरज लागत असते. भरपूर वेळा शेतजमिनीचा विषय कोर्टात असतो किंवा भावाभावांमध्ये जमिनीचे वाद सुरू असतात.

त्यावेळी जमिनीच्या  हिस्सेदारांकडून किंवा जमिनीच्या मालकांकडून भूमी अभिलेख कार्यालयात भूमापनासाठी अर्ज केला जात असतो. त्यानंतर शासकीय अधिकारी येऊन भूमापन करत असतात. यासाठी शेतकऱ्यांना दीर्घकाळ वाट पाहावी लागते. त्याचबरोबर जमिनीची मोजणी केलेली असताना त्यात अनेक त्रुटी देखील दिसून येतात. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागाकडून ई-मोजणी 2.0 या नवीन प्रणालीची निर्मिती करण्यात आलेली आहे. याबद्दलची सविस्तर माहिती सदर लेखातून जाणून घेऊया.  

शेतकऱ्यांना जमिनीच्या मोजणीची खूप वेळा गरज भासत असते-

शेतकऱ्यांना अनेक वेळा त्यांची शेतजमीन किंवा बिगर शेत जमिनीच्या मोजणीची गरज भासत असते. काही वेळा ही मोजणी वेळेत होणे  देखील गरजेचे असते. परंतु शासकीय कार्यालयांची कामे व कागदपत्रे व्यवहार यामध्ये खूप वेळ जातो व जमीन मोजणीसाठी दीर्घकाळ शेतकऱ्यांना वाट पाहावी लागत असते.

पारंपारिक जमीन मोजणीत त्रुटी-

जमीन मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज दाखल केल्यानंतर तेथील अधिकारी येऊन अर्जदारांची जमीन मोजणी करून देतात. त्यावेळी अधिकाऱ्यांकडून जमीन मोजताना अनेक त्रुटी राहिल्याच्या पाहण्यास मिळतात. एखाद्या जमिनीच्या ऑनलाईन नकाशात वेगळीच सीमा दिसत असते तर सत्य परिस्थिती वेगळीच हद्दत दिसत असते.

ई-मोजणी 2.0 ची निर्मिती-

भूमी अभिलेख विभागामार्फत ई-मोजणी 2.0 या प्रणालीची निर्मिती करण्यात आलेली आहे. सॅटलाईटद्वारे रोव्हर व लॅपटॉपच्या माध्यमातून ही मोजणी केली जाते. ही एक डिजिटल अद्यावत कार्यप्रणाली आहे. यासाठी सॅटलाईट रोव्हरचा वापर केला जातो.

या प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील विविध तालुके व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी जमिनीची मोजणी केली आहे. शासकीय मोजणी करत असताना त्याचे काही नियम आहेत या सर्व नियमांचे पालन करुन या प्रणालीच्या माध्यमातून जमीन मोजणी केली जाणार आहे. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांचा व शेतकऱ्यांचा देखील या प्रणालीच्या माध्यमातून मोजणी केल्यास वेळ वाचणार आहे.

आतापर्यंत राज्यातील सहा तालुक्यांमध्ये या प्रणालीचा वापर करण्यात आला आहे-

महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागामार्फत मोजणीचे काम केले जाते, त्यासाठी विभागामार्फत एका अद्यावत प्रणालीचा शोध लावण्यात आलेला आहे. राज्यातील करवीर, शिरोळ, हातकणंगले, भुदरगड, राधानगरी, गगनबावडा या सहा तालुक्यांमध्ये सध्या ई-मोजणी 2.0 प्रणालीच्या माध्यमातून जमीन मोजणीचे काम सुरू आहे.

1 तासात होते जमिनीची मोजणी-

ई-मोजणी 2.0 या प्रणालीच्या माध्यमातून जमीन मोजणीत कोणत्याही त्रुटी आढळून येत नाहीत व सर्वात महत्त्वाचे ही मोजणी फक्त एका तासात पूर्ण होते. आधीच्या पारंपारिक मोजणी मध्ये शासकीय अधिकाऱ्यांना जमीन मोजणी करताना खूप वेळ लागत होता. परंतु आता शेतकऱ्यांना तसेच जमीन मालकांना जमिनीची मोजणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारे दीर्घ कालावधीसाठी वाट पाहावी लागत नाही. अधिकारी येऊन फक्त एका तासा जमिनीची मोजणी करून जातात. ही प्रणाली डिजिटल व अद्यावत असल्याने ते ई नकाशांमध्ये देखील त्याचे रूपांतर होऊन झटपट मिळते.

ऊस पिकाची मोजणी करणे शक्य-

या अगोदर ऊस पिकाची मोजणी करायची म्हटलं तर ऊस पिक काढल्याशिवाय ते शक्य होत नव्हते. कारण त्याशिवाय जमिनीच्या हद्दीच दिसत नव्हत्या. परंतु आता तसे नाही, शासकीय विमा योजनेसाठी असो किंवा कोणत्याही इतर कारणासाठी असो ही मोजणी या नव्या प्रणालीच्या माध्यमातून ऊस पिकाची मोजणी करणे शक्य झाले आहे.

महाराष्ट्रातील विविध विभागांमध्ये डिजिटल कार्याप्रणालीचा वापर केला जातो. तसेच नागरिकांना वेळत सुविधा मिळव्यात त्यासाठी कार्यप्रणाली अद्यावत देखील केली जाते. भूमी अभिलेख विभागामार्फत जमीन मोजण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ई-मोजणी 2.0 ही प्रणाली शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *