माझा लाडका भाऊ योजना; अर्ज प्रक्रिया सुरू.

आज आपण सदर लेखातून अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्य शासनाने “माझा लाडका भाऊ” योजना ही सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून 12वी पास व त्या पुढील पदवीधरांना दरमहा 10 हजार रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कोठे व कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती.

सदर योजनेची पात्रता-

  • या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थी व्यक्तीचे वय हे 18 ते 35 वर्ष या दरम्यान असावे.
  • लाभार्थी हा किमान 12वी पास, ITI, पदवीधर असावा.
  • लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • लाभार्थ्याच्या बँक खात्याला आधार लिंक असणे गरजेचे आहे.
  • आधारला मोबाईल क्रमांक लिंक असणे गरजेचे आहे.
  • लाभार्थ्यांनी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्य विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असणे गरजेचे आहे.

सदर योजनेच्या माध्यमातून दरमहा किती रक्कम मिळणार?-

  • 12वी पास- 6,000 रु.
  • ITI/पदविका- 8,000 रु.
  • पदवीधर- 10,000 रु.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • 12वी पास प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • कामाचा अनुभव असेल तर अनुभव पत्र
  • पदवीधर असाल तर पदवीचे प्रमाणपत्र
  • बँक पासबुक

सदर योजनेचा अर्ज कोठे व कसा करावा-

सदर योजनेसाठी लाभार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इतर कोणत्याही स्वरूपात अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे फक्त ऑनलाईन पोर्टलद्वारे फॉर्म भरलेला ग्राह्य असणार आहे. खाली दिलेल्या लिंक वरती जाऊन आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

  • या योजनेचा अर्ज भरण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरती जायचे आहे.
  • त्यानंतर तेथे गेल्यावर तुम्हाला तुमची नोंदणी करायची आहे. नोंदणी करताना आवश्यक ती सर्व माहिती अर्जामध्ये टाकायची आहे, अर्ज चुकून द्यायचा नाही.
  • माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
  • त्यानंतर या योजनेचा फॉर्म सबमिट करायचा आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

सदर योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *