कांदा चाळ अनुदानामध्ये बदल; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा व कांदा उत्पादक संघटनेचा आंदोलनाचा इशारा.

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्यातील महायुती सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधातील आदेश काढल्यामुळे नवीन वाद निर्माण होणार आहे. वैयक्तिक कांदा चाळ अनुदान बंद करणे बंद करत अनुदान योजनेत बदल केला आहे.

त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादकांसह कांदा उत्पादक संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. त्याचबरोबर कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी कांदा उत्पादक संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

जर हा निर्णय मागे नाही घेतला तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करू असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. या निर्णयामुळे विधानसभा निवडणुकीचा तोंडावर सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सतत पडणाऱ्या भावामुळे व केंद्र सरकारच्या निर्यात बंदीच्या निर्णयामुळे अडचणीत आले आहेत.

सरकारद्वारे पुन्हा एकदा कांदा उत्पादकांचे हित विचारात न घेता निर्णय घेण्यात आलेला आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत(रोह्यो) कांदा चाळींना वैयक्तिक स्वरूपातील मिळणारे अनुदान बंद करण्यात आले आहे. आता वैयक्तिक ऐवजी शेतकऱ्यांना सामूहिक रित्या म्हणजेच बचत गट किंवा शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन कांदा चाळीसाठी अनुदान घ्यावे लागणार आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी-

रोह्या अंतर्गत कांदा चाळीसाठी सरकारकडून वैयक्तिक स्वरूपात अनुदान देण्यात येत होते. याचा फायदा शेतकऱ्यांना कांदा साठवून ठेवण्यासाठी होत होता. जेव्हा कांद्याला भाव कमी मिळत होता तेव्हा तो कांदा चाळीमध्ये साठवला जात होता व भाव मिळाल्यावर तो कांदा बाहेर काढला जात होता.

परंतु अनुदान बंद झाल्याने वैयक्तिकरित्या कांदा चाळीसाठी अनुदानाचा लाभ मिळणार नाही. यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा नाराजगी निर्माण झाली आहे. कांदा पट्ट्यातील अनेक शेतकऱ्यांना कांदा अनुदान बंद झाल्यामुळे याचा फटका बसू शकतो.

आंदोलनाचा इशारा-

आता कांदा चाळीला दिले जाणारे वैयक्तिक स्वरूपाचे अनुदान वाढवण्याची गरज असून ते देण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. परंतु शेतकऱ्यांची मागणी मान्य न करत सरकारने कांदा उत्पादकांची निराशा केल्याची टीका संघटनेने केली आहे व त्याचबरोबर प्रत्यक्ष शेतकऱ्याला कांदा चाळ उभारण्यासाठी अनुदान मिळावे अशी मागणी केली जात आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *