येत्या 1 ऑगस्टपासून राज्यात चालू खरीप हंगामासाठी भ्रमणध्वनीद्वारे ई-पीक पाहणीची सुविधा सर्व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. राज्यातील खरीप हंगामाची नोंदणी सरासरी 142 लाख हेक्टरवर घेतली जाते. त्यापैकी यंदा 15 जुलै पर्यंत शेतकऱ्यांनी 123 लाख हेक्टरच्या म्हणजेच 87 टक्केच्या पुढे पेरण्या पूर्ण केल्या आहेत.
मागील वर्षी या कालावधीपर्यंत 81 टक्के पेरण्या झाल्या होत्या. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू खरीप हंगामाच्या पेरणीची गती चांगली आहे. त्याचबरोबर पेरण्यानंतरच्या विविध पिकांच्या रोप उगवणी बाबत किंवा वाढीच्या अवस्थांविषयी कोणत्याही तालुक्यातून अजून तक्रार आलेली नाही. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस देखील चांगला झालेला आहे.
1 जून ते 15 जूलै या दरम्यान राज्यात सरासरी 367 मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित असतो. परंतु यंदा याच कालावधीत 410 मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या 111 टक्क्यांच्या पुढे पाऊस झालेला आहे. त्यामुळे भाताची पुनरलागवड वगळता इतर बहुतेक खरीप पिकांच्या पेरण्या शेतकऱ्यांनी पूर्ण केलेल्या आहेत.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार शेतकरी स्तरावरील पीक पाहणी 1 ऑगस्ट पासून सुरू झाल्यानंतर 45 दिवस चालू राहील. खरीप पिक पाहणी ही 15 सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या स्तरावरील समाप्त होईल. जर शासनाकडून शेतकऱ्यांना पुन्हा मुदत वाढ नाही मिळाली तर लगेच 16 सप्टेंबर पासून तलाठी किंवा सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी सुरू होईल.
तलाठी पीक-पहाणीची कामे पुढील 30 दिवस म्हणजेच 15 ऑक्टोंबर पर्यंत चालू ठेवतील. केंद्राने देशभर डिजीटल क्रॉप सर्व्हेची (डीसीएस) पद्धत चालू खरिपापासून लागू केली आहे. तरीसुद्धा राज्य शासनाने ही पीक पाहणी राज्यस्तरीय पद्धतीचा अवलंब करून स्वतंत्रपणे करावी असा निर्णय घेण्यात आलेला आहे.
म्हणजेच दोन्ही पद्धतीच्या ई-पीक पाहणी साठी वापरले जाणारे अॅप्लीकेशन एकच ठेवण्यात आले आहे. ही पीक पाहणी पद्धत राज्यातील फक्त 35 जिल्ह्यांपुरतीच मर्यादित असेल. इतर सर्व तालुक्यांमध्ये राज्य शासनाच्या जुन्या पद्धतीने ई-पीक पाहणी होणार आहे.
खालील दिलेल्या तालुक्याच्या 2858 गावांमध्ये होणार केंद्र शासनाची ‘डीसीएस’ पाहणी-
तालुक्यांची नावे व त्या समोर जिल्ह्याचे नाव
- वरुड – अमरावती
- पातूर – अकोला
- बुलडाणा – बुलडाणा
- दिग्रस – यवतमाळ
- रिसोड – वाशिम
- फुलंब्री – छत्रपती संभाजीनगर
- लोहारा – धाराशिव
- बदनापूर – जालना
- मुदखेड – नांदेड
- सोनपेठ – परभणी
- वडवणी – बीड
- जळकोट – लातूर
- औंढा नागनाथ – हिंगोली
- अंबरनाथ – ठाणे
- तलासरी – पालघर
- वेंगुर्ला – सिंधुदुर्ग
- तळा – रायगड
- लांजा – रत्नागिरी
- काटोल – नागपूर
- देसाईगंज – गडचिरोली
- आमगाव – गोंद्या
- सिंदेवाही – चंद्रपूर
- साकोली – भंडारा
- कारंजा घा. – वर्धा
- देवळा – नाशिक
- श्रीरामपूर – अहमदनगर
- भुसावळ – जळगाव
- शिंदखेडा – धुळे
- तळोदा – नंदुरबार
- दौंड – पुणे
- गगनबावडा – कोल्हापूर
- पलूस – सांगली
- खंडाळा – सातारा
- द. सोलापूर – सोलापूर
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.