सातबारा उतारा डाऊनलोड करण्याचे ऑनलाईन पोर्टल 19 ते 22 जुलै दरम्यान बंद राहणार आहे?

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. भूमी अभिलेख विभागाचे ऑनलाईन पोर्टल तांत्रिकदृष्ट्या अद्यावत करण्यासाठी बंद करण्यात येणार आहे. हे पोर्टल 19 ते 22 जुलै या दरम्यान बंद राहणार आहे. या तीन दिवसांमध्ये सातबारा उतारा, मिळकत पत्रिका, फेरफार उतारे हे ऑनलाईन डाऊनलोड करता येणार नाहीत, अशी माहिती राज्य समन्वयक यांनी दिली आहे.

ई- फेरफार, ई-हक्क, ई-चावडी तसेच ई-महाभूमी या पोर्टलच्या माध्यमातून सातबारा उतारे, आठ अ उतारा, मिळकत पत्रिका, फेरफार उतारे ऑनलाईन डाऊनलोड करता येतात. या पोर्टलचे सॉफ्टवेअर हे जुने झाल्यामुळे सध्या त्याला वेगाची मर्यादा येत आहे. त्यामुळे उतारा डाऊनलोड करताना अडचणी येतात.

हे सॉफ्टवेअर 2016 पासून वापरात आहे. त्यामुळे त्यात आधुनिकता आणणे गरजेचे झाले आहे. यामुळेच भूमी अभिलेखाद्वारे हे सॉफ्टवेअर अद्यावत करण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यामुळे विभागाद्वारे चालवण्यात येणारे सर्व पोर्टल हे 19 जुलैच्या सायंकाळी 6 वाजल्यापासून 22 जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.

नवीन सॉफ्टवेअरचे वैशिष्ट्ये-

नवीन सॉफ्टवेअर हे 2024 मध्ये तयार करण्यात आलेले आहे. त्याची चाचणी देखील यशस्वीरित्या पार पडली आहे. त्यामुळे त्याचा वापर सुरू झाल्यानंतर उतारे अगदी कमी वेळात डाऊनलोड करता येतील, अशी माहिती नरके यांनी दिली आहे.

सध्या ई-पीक पाहणी, खरीप पिक विमा योजना तसेच अन्य योजनांसाठी शेतकरी अर्ज करत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे त्यांनी 19 जुलैच्या अगोदरच काढून घ्यावी. त्यामुळे अर्ज करण्यासाठी अडचण येणार नाही असे आव्हान करण्यात आलेले आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *