मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी व किती मिळणार?

आज आपण सदर लेखातून आनंदाची व महत्त्वाची बातमी लाडकी बहीणींसाठी घेऊन आलेलो आहोत. अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला तेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेची चर्चा ही राज्यभरच म्हणजे गावा-गावात सुरू आहे. या योजनेची अंमलबजावणी ही सुरू झालेली आहे.

अनेक महिलांनी आपला ऑनलाईन अर्ज देखील दाखल केले आहेत. त्याचबरोबर विविध जिल्ह्यांमध्ये ऑफलाईन अर्ज देखील दाखल केले जात आहे. म्हणूनच शासनाकडून ही योजना अधिक सुलभ करण्यासाठी त्यातील तांत्रिक अडचणी ही दूर केल्या जात आहेत. नारीशक्ती दूत अ‍ॅपवरूनही सहजपणे अर्ज भरणे शक्य होत आहे.

सदर योजनेचा पहिला हप्ता कधी जमा होणार?-

रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर योजनेचा पहिला हप्ता जमा होणार आहे अशी माहिती दिली जात आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तारीख देखील जाहीर केली आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरला विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पद्धतीने पूजा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की लाडक्या बहिणी योजनेचा पहिला हप्ता हा 15 ऑगस्ट या तारखेला दिला जाणार आहे.

तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रक्षाबंधनची भेट म्हणून लाडक्या बहिणींना योजनेच्या हप्त्याची रक्कम दिली जाईल असे सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीतील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता कधी मिळणार आहे याबद्दल स्पष्टता दिली. 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट पर्यंत म्हणजेच रक्षाबंधनच्या निमित्ताने या योजनेचा पहिला टप्पा किंवा पहिला हप्ता जमा होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

त्यामध्ये दोन महिन्यांचा हप्ता देण्यात येणार आहे म्हणजेच प्रत्येक लाडक्या बहिणीचे 3,000 रुपये थेट बँक खात्यात जमा होतील. परंतु जर हा निधी 15 तारखेला देण्यात येणार असला तरी 31 ऑगस्टपर्यंत ज्यांचे अर्ज येतील ते अर्ज जुलै महिन्यातच आले आहे असे ग्राह्य धरले जाईल. तसेच त्यांनाही त्याच्या पुढच्या महिन्यात जुलै व ऑगस्ट महिन्याचे पैसे देण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणाचेच नुकसान होणार नाही असे यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *