प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या माध्यमातून एक रुपयात पिक विमा भरण्यासाठी आता 31 जुलैपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा माध्यमातून एक रुपयात पिक विमा भरण्यासाठी आज म्हणजे दिनांक 15 जुलै ही शेवटची मुदत होती. परंतु राज्यातील बरेचसे शेतकरी अजूनही काही कारणांमुळे पीक विमा भरण्यापासून वंचित राहिलेले आहेत. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे त्या शेतकऱ्यांना संधी मिळावी यासाठी पिक विमा भरण्यास मदत वाढ मिळावी अशी मागणी करण्यात आली होती.

त्यांनी मागणी केल्यानंतर आता या मुदतीमध्ये 31 जुलै पर्यंत वाढ करण्यात आली आहे. सध्या राज्यात लाभार्थ्यांची कॉमन सर्विस सेंटरला (CSC) गर्दी होत आहे. यामुळे सर्व्हरची गती कमी झालेली आहे .त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज व लागणारी कागदपत्रे जोडताना वेळ लागत आहे. तसेच अनेक शेतकरी हे पीक विमा योजने पासून वंचित आहे. या सर्व कारणामुळे पीक विम्याचा अर्ज करण्यास मुदत वाढ मिळावी यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात आला होता.

त्यानुसार सोमवारी संध्याकाळी एक रुपया पिक विमा अर्ज भरण्याची मुदत आता 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आली आहे याबद्दल कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करून केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार मानले आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा प्रधानमंत्री पिक विमा भरायचा राहिला आहे त्यांनी लवकरात लवकर भरून घ्यावा.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *