आज आपण सदर लेखातून बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची तसेच महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. महाराष्ट्रभर सध्या माझी लाडकी बहीण या योजनेबद्दलची चर्चा सुरू आहे. या योजनेसाठी महिलांकडून अर्ज देखील मागवण्यात आले आहेत.
या योजनेची चर्चा सुरू असताना नागरिकांकडून मागणी होत होती की, राज्यातील तरुणांना देखील शासकीय योजना आखली जावी. त्यामुळे शासनाने बेरोजगार तरुणांसाठी नव्याने योजना जाहीर केली आहे. या योजनेस “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” असे संबोधित करण्यात आले आहे. चला तर मग सदर लेखातून या योजनेबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
सदर योजनेची माहिती-
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देण्यात येते व त्यांना योग्य त्या नोकरीसाठी नियुक्त करण्यात करण्यात येते किंवा प्रशिक्षित तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत म्हणून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे.
सदर योजनेचे उद्दिष्ट-
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार तरुणांना त्यांच्या शिक्षणानुसार प्रशिक्षण दिले जाते व त्यांचे विविध कंपन्यांसोबत टायअप करून त्या प्रशिक्षित तरुणाची नेमणूक केली जाते. यामुळे राज्यातील तरुणांना नोकरी मिळण्यास मदत मिळते किंवा प्रशिक्षण घेऊन ते स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकतात.
सदर योजनेच्या माध्यमातून शिक्षणाप्रमाणे प्रशिक्षणासाठी मिळणारे मानधन-
या योजनेच्या माध्यमातून खाली दिलेले शिक्षण पूर्ण असेल, तसे विविध व्यवसायाचे किंवा विविध उद्योगांमधील तंत्रज्ञानाविषयक प्रशिक्षण दिले जाते. हे मानधन प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांना नोकरी मिळत नाही तोपर्यंत चालू राहणार आहे.
- जे बेरोजगार तरुण 12वी पास आहेत त्यांना प्रशिक्षणासाठी 6000 रुपये प्रति महिना शासन देणार आहे.
- आयटीआय, पदविका प्राप्त बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण घेण्यासाठी शासनामार्फत 8000 रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे.
- जे बेरोजगार पदवीधर व पदव्युत्तर आहेत त्यांना प्रशिक्षणासाठी 10000 रुपये प्रति महिना शासनामार्फत देण्यात येणार आहे.
सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचे पॅन कार्ड
- बँक खात्याचे तपशील
- जे शिक्षण पूर्ण आहे त्याचे प्रमाणपत्र
सदर योजनेची पात्रता-
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
- अर्जदाराचे वय हे किमान 18 वर्षे पूर्ण असायला पाहिजे.
- अर्जदार हा इयत्ता बारावी उत्तीर्ण, आयटीआय, पदविका, पदवी किंवा पदव्युत्तर असायला हवा.
- अर्जदाराचे आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक असणे गरजेचे आहे.
सदर योजनेसाठी कोणाला अर्ज करता येऊ शकेल?-
या योजनेचा अर्ज हा ऑनलाईन पध्दतीने स्वीकारला जाणार आहे. या योजनेचा लाभासाठी उमेदवारांनी कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करावी व रोजगार नोंदणी क्रमांक मिळालेला असावा. यानंतरच या योजनेचा लाभ त्या उमेदवाराल घेता येणार आहे.
सदर योजनेचे वैशिष्ट्ये-
- या योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेणाऱ्या लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट ऑनलाईन पद्धतीने दर महिन्याला रक्कम जमा करण्यात येईल.
- जर प्रशिक्षण घेणारा प्रशिक्षणार्थी महिन्यातून 10 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर राहिला तर संबंधि प्रशिक्षणार्थ्याला त्या महिन्याचे वेतन मिळणार नाही, असे देखील शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
- त्यामुळे फक्त पैसे मिळवून चालणार नाही तर प्रशिक्षणासाठी हजर राहून योग्यरीत्या प्रशिक्षण पूर्ण करणे गरजेचे आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.