सदर योजनेची माहिती-
बाल संगोपन योजनेच्या माध्यमातून आता 2,250 रुपये मिळतात. या योजनेच्या माध्यमातून अगोदर 1,100 रुपये मिळत होते. त्यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे. विधवा, घटस्फोटीत महिला, अनाथ बालकांसाठी, तसेच एकल पालक या सर्वांसाठी ही योजना राबवण्यात येते. ही योजना महिला व बालकल्याण विभागाच्या मार्फत राबवण्यात येते. कोरोनानंतर या योजनेच्या लाभार्थी संख्येत वाढ झालेली आहे. सुरुवातीला अर्जदारांची गृह चौकशी करण्यात येते. तसेच पालकाचे उत्पन्न एक लाख रुपयेपर्यंत असणे गरजेचे आहे. खरोखर ज्यांना गरज आहे, अशा लाभार्थ्यास लाभ दिला जातो.
सदर योजनेच्या नियम व अटी-
- एकल पालक म्हणजे ज्या मुलांचे आई किंवा वडील वारले आहेत, अशा एक पालक असलेल्या मुलांना, कॅन्सर किंवा एचआयव्ही बाधित दुर्धर आजार असलेल्या पालकांच्या मुलांना, तुरुंगात असलेल्या कैद्यांच्या मुलांना या योजनेचा लाभ दिला जातो.
- अशा पालकांच्या कोणत्याही दोन अपत्यांना वयाचे 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला प्रत्येकी 2,250/- रुपये मिळतात. त्यामुळे दोन्ही अपत्यांचे स्वतंत्र फॉर्म भरावेत.
- घटस्फोटीत व परित्यक्ता महिला ज्या आहेत त्यांच्या मुलांनाही या योजनेचा लाभ दिला जातो. फक्त महिलांनी घटस्फोट झाल्याचे कागदपत्रांसह अर्ज करावा. तर ज्या महिला पती पासून विभक्त राहत आहेत, त्यांनी तसे पुरावे व सक्षम अधिकाऱ्यांच्या सहीचे पत्र सादर करावे.
सदर योजनेचा अर्ज कोठे करावा?-
महिला व एकात्मिक बालविकास विभागाच्या कार्यालयात (पंचायत समिती) कुटुंब संरक्षण अधिकारी यांच्याकडून अर्ज पूर्ण भरून तालुका स्तरावर तपासून घ्यावा व त्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी बाल कल्याण समितीसमोर मुलांना समक्ष नेऊन फॉर्म जमा करावा.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.