प्रत्येक वर्षी OBC विद्यार्थ्यांना मिळणार 60 हजार रुपये. हा फॉर्म भरून द्या.

आज आपण सदर लेखातून विद्यार्थ्यांसाठी आनंदाची व त्याचबरोबर महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या विद्यार्थ्यांकरता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने दि.19-10-2023 रोजी बैठकीत मान्यता देण्यात आली होती.

शासनाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या माध्यमातून इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग  विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी 60,000 रुपये स्कॉलरशिप देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठीचा अर्ज कोठे व कोणता भरायचा आहे, पात्रता काय आहे, कागदपत्रे कोणती  याबद्दलचे संपूर्ण माहिती सदर लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

सदर योजनेची पात्रता-

  • विद्यार्थी हा वस्तीगृह प्रवेशास पात्र असावा.
  • विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
  • सक्षम प्राधिकार्‍याने दिलेला इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचा जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
  • अनाथ प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाकडून सक्षम प्राधिकार्‍याचे अनाथ प्रमाणपत्र गरजेचे आहे.
  • दिव्यांग प्रवर्गामधून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांचे 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र गरजेचे आहे.
  • विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रुपये 2.50 लाख पेक्षा जास्त नसावे.
  • विद्यार्थ्याचने स्वतःचा आधार क्रमांक आपल्या राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक आहे.
  • विद्यार्थ्याने ज्या शहराच्या/तालुक्याच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतलेला आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा.

सदर योजनेचा शैक्षणिक निकष-

  • सदरचा विद्यार्थी 12वी नंतर उच्च शिक्षण घेत असावा.
  • व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यास सदर योजनेसाठीचा अर्ज करताना किमान 60 टक्के किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन/CGPAचे गुण असणे आवश्यक आहे.
  • व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार त्या संबंध प्रवर्गातून प्रवेश देण्यात येईल. यासाठी इयत्ता 12वीच्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल.
  • या योजनेच्या माध्यमातून एकूण प्रवेश संख्येचा 70 टक्के जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व 30% जागा इतर व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतील.
  • अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्था इत्यादी मार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालयात/संस्थेमध्ये व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असावा.
  • एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांस या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
  • या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवण्याकरिता विद्यार्थ्याची महाविद्यालयीन उपस्थिती किमान 75 टक्के असावी.
  • निवड करण्यात आलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहणार आहे. परंतु विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.

सदर योजनेच्या अटी-

  • या योजनेचा लाभ 12 वी नंतर उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यास देण्यात येईल. जास्तीत जास्त 5 वर्ष सदर योजनेचा लाभ घेता येईल. परंतु इंजिनिअरिंग/ वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त 6 वर्ष अनुज्ञेय असेल.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी कमाल वयोमर्यादा ही 30 वर्षापेक्षा जास्त नसावी.
  • अभ्यासक्रमच्या मध्यंतरी प्रवेश घेतलेला विद्यार्थी हा या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यास पात्र असेल.
  • शिक्षणात खंड पडलेल्या विद्यार्थी या योजनेच्या लाभास पात्र असेल.
  • सदर योजनेत पात्र असणारा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास, या योजनेचा लाभ अनुत्तीर्ण कालावधीमध्ये देण्यात येणार नाही. उत्तीर्ण झाल्यानंतर असा विद्यार्थी पुढील लाभास पात्र असणार आहे.
  • प्रति जिल्हा या योजनेच्या माध्यमातून 600 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येईल.
  • विद्यार्थी वस्तीगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा किंवा इतर कोणत्याही लाभात विद्यार्थी अनुज्ञेय नसावा.
  • या योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा. जर विद्यार्थ्याने व शैक्षणिक संस्थांनी सदर योजनेमध्ये फसवणूक केलेली आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सदर योजनेत निश्चित करण्यात आलेले आरक्षण-

सामाजिक प्रवर्गसदर योजनेतंर्गत अनुज्ञेय आरक्षण
इतर मागास प्रवर्ग59
विमुक्त जाती व भटक्या जमाती34
विशेष मागास प्रवर्ग6
अनाथ1

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • जर भाड्याने राहत असल्यास व स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र (नोटरी)
  • स्वयंघोषणापत्र
  • कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र
  • भाड्याने राहत असल्यास भाडे चिट्ठी व भाडे करारपत्र/ करारनामा
  • महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा

सदर योजनेचे अनुदानाच्या वितरणाचे हप्ते-

हप्तात्रैमासिक कालावधीरक्कम जमा करण्याचा कालावधी
पहिला हप्ताजून ते ऑगस्टज्या दिवशी विद्यार्थ्यांचा/ विद्यार्थिनीचा ऑनलाईन अर्ज मंजूर होईल, त्यानंतर 7 दिवसांमध्ये
दुसरा हप्तासप्टेंबर ते नोव्हेंबरऑगस्टचा दुसरा आठवडा
तिसरा हप्ताडिसेंबर ते फेब्रुवारीनोव्हेंबरचा दुसरा आठवडा
चौथा हप्तामार्च ते मेफेब्रुवारीचा दुसरा आठवडा

सदर योजनेचा अर्ज कोठे व कधीपर्यंत करावा-

खालील दिलेला अर्ज डाउनलोड करून तो व्यवस्थित भरून आपल्या जिल्ह्यातील इतर मागास बहुजन कल्याण मंडळ इथे जाऊन अर्ज करावा. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै आहे .तसेच या योजनेबाबतच्या अधिक माहितीसाठी खालील GR पहावा.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

GR1 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

GR2 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *