या सरकारी योजना आहेत विधवा महिलांसाठी फायद्याच्या.

प्रत्येक स्त्रीच्या मनात लग्न व विवाहित जीवनाची हजारो स्वप्न असतात. परंतु जेव्हा जीवनसाथी आयुष्याच्या मध्यावरच साथ सोडतो तेव्हा अनेक स्वप्ने ही अपुरी राहतात. एखाद्या महिलेच्या पतीचा मृत्यू झाल्यास तिच्या वाट्याला केवळ दुःखच व निराशा येते.

आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून 23 जून हा दिवस जगभरात ओळखला जातो. अशा परिस्थितीत देखील ज्या महिलांना घरात बसून आर्थिक दृष्ट्या मजबूत बणायचे आहे, त्यांच्यासाठी या योजना खूप उपयोगी ठरणाऱ्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोण कोणत्या सरकारी योजनेचा लाभ विधवा महिला घेऊ शकतात.

इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना-

या योजनेचा लाभ विधवा महिला घेऊ शकतात या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिक दृष्ट्या कुमकुवत महिलांना पेन्शनद्वारे मदत करणे हा आहे. विधवा महिलांना मदत मिळावी म्हणून केंद्र शासनाने ही योजना सुरू केली आहे. 40 वर्षापेक्षा जास्त व 59 वर्षापेक्षा कमी वयाच्या विधवा महिलांना या योजनेच्या माध्यमातून दरमहा पैसे दिले जातात.

विधवा पेन्शन योजना-

ज्या महिलेच्या पतीचे अकाली निधन झाले आहे, अशा महिलांना या योजनेच्या माध्यमातून पेन्शन दिली जाते. ही पेन्शन योजना देशातील सर्व राज्यांमध्ये लागू आहे. परंतु तिची प्रक्रिया थोडी वेगळी आहे. या योजनेच्या माध्यमातून विधवा महिलांना आर्थिक दृष्ट्या मजबुती मिळते.

महिला ई हाट योजना-

या योजनेच्या माध्यमातून महिला स्वावलंबी बनू शकतात. या योजनेचा मुख्य उद्देश विधवा महिलांना त्यांनच्या कलागुणांच्या कमाईतून लाभ मिळवून देणे हा आहे. ही या योजनेच्या माध्यमातून महिला व बाल विकास मंत्रालयाने एक प्लॅटफॉर्म तयार केला आहे. ज्याच्याद्वारे महिला त्यांच्या कलेतून कमाई करू शकतात.

महिला शक्ती केंद्र योजना-

ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. विधवा महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेच्या माध्यमातून महिलांचे आरोग्य, रोजगार, डिजिटल साक्षरता इत्यादी सुविधा पुरविल्या जातात.

शिलाई मशीन योजना-

ही योजना 2020 मध्ये सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब महिला किंवा महिलांना रोजगार मिळू शकतो. या योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांना शिलाई मशीन पुरवण्यात येत.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *